कारवाईपूर्वी मिळते रेती तस्करांना माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:15 IST2020-12-28T04:15:21+5:302020-12-28T04:15:21+5:30
रेती तस्करी रोखण्याचे आव्हान सिंदेवाही : तालुक्यातील रेती घाटावर मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात आहे. रेती चोरीला पायबंद ...

कारवाईपूर्वी मिळते रेती तस्करांना माहिती
रेती तस्करी रोखण्याचे आव्हान
सिंदेवाही : तालुक्यातील रेती घाटावर मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात आहे. रेती चोरीला पायबंद लावण्यात अद्याप महसूल विभागाला यश आले नाही. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. रेती तस्करावर कारवाई करण्याची माहिती आधीच तस्करांना मिळत असल्याने महसूल विभागात काही तस्करांचे गुप्तहेर असल्याचे बोलले जात आहे. ,
तालुक्यातील रेती घाटाचे लिलाव झाले नसले तरी मोठ्या प्रमाणात तस्कर रेतीचा उपसा करीत आहेत. अवैध उत्खनन, अवैध वाहतूक, अवैध साठवणूक, हा प्रकार महसूल विभागाच्या डोळ्यादेखत सुरू आहे. नियमाची पायमल्ली होत आहे. मागील तीन वर्षापासून तालुक्यातील रेती घाटाचे लिलाव झाले नाही. तालुक्यात रेतीचा तुटवडा केव्हाही भासला नाही. तालुक्यातील सहा रेती घाटांची लिलावाची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच निविदा ग्रामपंचायतच्या निवडणुकीनंतर उघडण्यात येईल, असे सांगण्यात येते. विशेष म्हणजे या तालुक्यातील रेती नागपूर व मध्यप्रदेश येथे मोठ्या दराने विकली जाते.