संजय गांधी निराधार योजनेची १३१ प्रकरणे मंजूरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:55 IST2020-12-11T04:55:34+5:302020-12-11T04:55:34+5:30
राजुरा : संजय गांधी निराधार योजनेच्या प्रकरणाला मंजुरी देण्याच्या अनुषंगाने आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत श्रावणबाळ योजनेतंर्गत ...

संजय गांधी निराधार योजनेची १३१ प्रकरणे मंजूरी
राजुरा : संजय गांधी निराधार योजनेच्या प्रकरणाला मंजुरी देण्याच्या अनुषंगाने आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत श्रावणबाळ योजनेतंर्गत ७४, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेतंर्गत नऊ, संजय गांधी निराधार योजनेतंर्गत ४१, दुर्धर आजार योजनेतंर्गत दोन अशा १३१ प्रकरणांना मंजुरी प्रदान करण्यात आली.
महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर अनेक सरकारी समित्यांवर नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या. त्यातील प्रलंबित समित्यांच्या बैठकांना आता सुरुवात झाली आहे. येथील संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्ष पदाची धुरा साईनाथ बतकमवार यांच्या हातात येतात पहिली बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत सर्व प्रकारच्या अर्जाची तपासणी करण्यात आली. आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करणाऱ्या इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेतंर्गत नऊ, संजय गांधी निराधार योजनेतंर्गत ४१, दुर्धर आजार योजनेतंर्गत दोन अशा १३१ प्रकरणांना मंजुरी प्रदान करण्यात आली. पहिल्याच बैठकीत इतक्या मोठ्या प्रमाणात प्रकरणांना मंजुरी मिळाल्याने दीर्घ काळापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या निराधार व गरजू नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बैठकीला अध्यक्ष साईनाथ बतकमवार, सचिव तथा तहसीलदार हरिष गाडे, नायब तहसीलदार गांगुर्डे, अशासकीय सदस्य कोमल फुसाटे, भाग्यश्री आत्राम, विकास देवालकर वासुदेव चाफले, कादिर इब्राहिम सय्यद, कवडू सातपुते, राजू डोहे, संतोष देरकर, मोहम्मद सईद गटविकास अधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.