निराधारांच्या १२९ प्रकरणांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:25 IST2021-03-22T04:25:03+5:302021-03-22T04:25:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मूल : संजय गांधी निराधार योजनेची बैठक अध्यक्ष राकेश रत्नावार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या ...

निराधारांच्या १२९ प्रकरणांना मंजुरी
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : संजय गांधी निराधार योजनेची बैठक अध्यक्ष राकेश रत्नावार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला नायब तहसीलदार यशवंत पवार, पंचायत समिती, मूलचे गटविकास अधिकारी डॉ. मयूर कळसे, अशासकीय सदस्य नितीन येरोजवार, दशरथ वाकुडकर, सत्यनारायण अमरूदिवार, रूपाली संतोषवार, अर्चना चावरे, आदी सदस्य उपस्थित होते. या बैठकीमध्ये १३४ प्रकरणे समोर ठेवण्यात आली. त्यात छाननी व साधकबाधक चर्चा करुन १२९ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार यांनी संगितले की, गरीब, गरजूंना या योजनेचा लाभ मिळत असल्याने काही दलाल तहसील कार्यालयात लावलेली यादी बघून संबंधित लाभार्थींची लूट करण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रकरणे मंजूर झाल्याबाबत गावातील तलाठ्यांमार्फत कळविण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. तसेच ऑनलाईन अर्ज भरताना लाभार्थीला अडचणी येत होत्या. त्यामुळे ऑनलाईन सोबतच ऑफलाईनसुद्धा अर्ज भरता येईल, अशी व्यवस्था केल्याचे त्यांनी सांगितले.