चिमूर तालुक्यात समिश्र कौल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:30 IST2021-01-19T04:30:21+5:302021-01-19T04:30:21+5:30

चिमूर : चिमूर तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींची मतमोजणी येथील बालाजी रायपूरकर सभागृहात कडक बंदोबस्तात पार पडली. त्यात काॅंग्रेस, भाजप या ...

Samishra Kaul in Chimur taluka | चिमूर तालुक्यात समिश्र कौल

चिमूर तालुक्यात समिश्र कौल

चिमूर : चिमूर तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींची मतमोजणी येथील बालाजी रायपूरकर सभागृहात कडक बंदोबस्तात पार पडली. त्यात काॅंग्रेस, भाजप या दोन पक्षाचा निकालात आपलाच वरचष्मा असल्याचा दावा केला आहे. अनेक गावात मतदारांनी अपक्ष गाव पॅनलच्या हातात सत्ता दिली.

ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष लागून असलेल्या मतमोजणीला सोमवारी सकाळी ११ वाजता सुरुवात करण्यात आली. निवडणूक अधिकारी यांच्या ढिसाळ नियोजनाने दुपारपर्यंतसुध्दा पहिला निकाल जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे सायंकाळी ५ वाजेपर्यंत शेवटचा निकाल लागला.

चिमूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकलामध्ये स्थानिक गाव पातळीवर पॅनल तयार करून निवडणूक वाढविण्यात आल्या. त्यामध्ये अनेक गावात स्थानिक पॅनलने विजय संपादन केला तर काॅंग्रेस, भाजप, या दोन पक्षांनी तालुक्यात जवळपास समसमान ग्रामपंचायतमध्ये सत्ता काबीज केली तर राष्ट्रवादीने चार ग्रामपंचायत काबीज केल्या. मनसे ने वाहानगाव येथील सत्ता कायम ठेवली आहे

बॉक्स

ईश्वर चिठ्ठीने ठरले चार उमेदवारांचे भाग्य

चिमूर तालुक्यातील जामगाव (कोमटी), बोथली (वाह), बोडधा व आंबेनेरी ग्रामपंचायत येथील चार उमेदवारांना समान मते मिळाल्याने चार उमेदवारांचा निकाल ईश्वर चिठ्ठीने निकाल काढण्यात आला.

बॉक्स

चिमूर ते भिसी मार्ग बंद प्रवाशांचे हाल

चिमूर-भिसी मुख्य मार्गावरील बालाजी रायपूरकर सभागृहात मतमोजणी असल्याने हजारे पेट्रोलपंप येथून बॅरिकेट्स लावून रस्ता बंद केला होता. त्यामुळे पिंपळनेरी, येरखेडा खापरी येथे जाणारे वाहन जांभुळघाटमार्गे वळवण्यात आली होती. त्यामुळे वाहनधारकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला.

बॉक्स

मतमोजणी परिसरात थाटली दुकाने

निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवाराला आनंदोत्सव साजरा करण्याकरिता लागणारे फुलांचे हार, गुलाल व नाश्त्याची दुकाने परिसरात थाटल्याने उमेदवारांना तिथेच गुलाल व हार मिळाल्याने सुविधा झाली होती.

बॉक्स

गदगाव ग्रामपंचायतीमध्ये पती-पत्नी विजयी

चिमूर तालुक्यातील नऊ सदस्य संख्या असलेल्या गदगाव ग्रामपंचायतमध्ये राजू मुरकुटे व त्याची पत्नी कीर्ती राजू मुरकुटे विजयी झाले. त्यामुळे पती-पत्नी गावगड्याच्या कारभारात हातभार लावणार आहेत.

Web Title: Samishra Kaul in Chimur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.