चंद्रपुरात सलून व्यावसायिकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 11:59 IST2020-06-15T11:59:20+5:302020-06-15T11:59:40+5:30

ऊर्जानगर येथील समता नगर येथे एका सलून व्यावसायिकाने सोमवारी सकाळी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. स्वप्नील चौधरी २७ असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.

Salon trader commits suicide in Chandrapur | चंद्रपुरात सलून व्यावसायिकाची आत्महत्या

चंद्रपुरात सलून व्यावसायिकाची आत्महत्या


लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ऊर्जानगर येथील समता नगर येथे एका सलून व्यावसायिकाने सोमवारी सकाळी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. स्वप्नील चौधरी २७ असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.
शेजारी राहणाऱ्या युवकाने सकाळी ७.३० वाजता स्वप्नील अजून उठला नाही म्हणत आवाज दिला. परंतु काहीही प्रतिसाद मिळत नाही आहे हे बघत शेजारील लोक एकत्रित झाले आणि दार उघडून बघितले असता स्वप्नील गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. लगेच पोलिसांना कळविण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार स्वप्नीलला आई-वडील नाही. तो घरी एकटाच राहत होता.
कोरोनाचे संकट असल्याने लॉकडाऊन झाल्यामुळे सलून व्यवसायाला झळ पाहोचली आहे. उपासमार होत असल्याने तर या सलून व्यावसायिकांने आत्महत्या केली नसेल ना अशी चर्चा परिसरात सुरु आहे.

Web Title: Salon trader commits suicide in Chandrapur