संपूर्ण राज्यात सुगंधित तंबाखूवर बंदी असतानासुद्धा शहरात ही बंदी नावापुरती आहे. परंतु, आता संचारबंदीच्या दिवसातही ही दुकाने बंद ठेवायला पाहिजे असताना शहरात मुख्य रस्त्यावर जुने बसस्थानक, गांधी चौक, भद्रनाग मंदिर, गवराळा, विजासन, बंगाली कॅम्प, फुकट नगर येथे मुख्य रस्त्यावरच सुपारीचा मोठा साठा काउंटरवर समोर ठेवून पहाटे पाच वाजल्यापासून सुगंधित तंबाखू मिश्रित खर्रा घोटाईचे काम चालू असते. येथे मोठ्या प्रमाणात शौकिनांची खरेदीसाठी गर्दी होत असते. मात्र, हा संपूर्ण प्रकार प्रशासनाला दिसत असला तरी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात आहे. सुगंधित तंबाखूमिश्रित खर्रापासून कोरोनाचा फैलाव झाल्यास मोठा हाहाकार होईल. सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या मोठ्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने जरी बंद ठेवली असली तरी त्यांच्या व त्यांच्या नातेवाइकांच्या घरी मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूचा स्टॉक जमा आहे.
संचारबंदीतही सुगंधित तंबाखूची विक्री जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:25 IST