मनसैनिकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:43 AM2021-02-23T04:43:03+5:302021-02-23T04:43:03+5:30

चंद्रपूर : जीआरएन कंपनीमध्ये जनहितासाठी केलेल्या आंदोलनामध्ये मनसे चंद्रपूर शहराध्यक्ष मनदीप रोडे व महाराष्ट्र सैनिकांवर ३९५ कलमान्वये दाखल केलेले ...

Sakade to withdraw crimes against Mansainiks | मनसैनिकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी साकडे

मनसैनिकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी साकडे

Next

चंद्रपूर : जीआरएन कंपनीमध्ये जनहितासाठी केलेल्या आंदोलनामध्ये मनसे चंद्रपूर शहराध्यक्ष मनदीप रोडे व महाराष्ट्र सैनिकांवर ३९५ कलमान्वये दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

जीएनआर कंपनीमध्ये स्थानिकांना नोकरी देण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली, परंतु याकडे दुर्लक्ष करून कंपनी प्रशासन स्थानिकांना डावलत आहे. त्यामुळे लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. अंदोलनादरम्यान कंपनीतील कर्मचाऱ्यांनी अर्वाच्च भाषा व महिलांबद्दल अनउद्गार काढल्याने बेरोजगारांचा उद्रेक भडकला. घटनेतील गुन्ह्याबाबत आम्हाला कोणताही आक्षेप नाही, परंतु ३९५ चोरी व दरोड्याचा दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, महिला सेना जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड, रोजगार स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष राजू बघेल, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, विवेक धोटे, मनोज तांबेकर, महेश शास्त्रकार, करण नायर, माया मेश्राम, अर्चना आमटे, प्रकाश नागरकर, मयूर मदनकर, सुयोग धनवलकर आदी उपस्थित होते.

Web Title: Sakade to withdraw crimes against Mansainiks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.