संत गाडगे बाबांचा विचार विज्ञाननिष्ठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 23:07 IST2018-02-23T23:07:35+5:302018-02-23T23:07:35+5:30

अज्ञान, अस्वच्छता, अंधश्रद्धा यांनी बुरसटलेल्या समाजाचा विकास करण्याचे व्रत हाती घेऊन संत गाडगे बाबांनी कीर्तनाचा प्रभावी वापर केला. या विचारांमध्ये वैज्ञानिक दृष्टी आहे, असे प्रतिपादन महापौर अंजली घोटेकर यांनी यांनी केले.

Saint Gadge Baba thinks science | संत गाडगे बाबांचा विचार विज्ञाननिष्ठ

संत गाडगे बाबांचा विचार विज्ञाननिष्ठ

ठळक मुद्देअंजली घोटेकर : मनपात जयंती उत्सव

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : अज्ञान, अस्वच्छता, अंधश्रद्धा यांनी बुरसटलेल्या समाजाचा विकास करण्याचे व्रत हाती घेऊन संत गाडगे बाबांनी कीर्तनाचा प्रभावी वापर केला. या विचारांमध्ये वैज्ञानिक दृष्टी आहे, असे प्रतिपादन महापौर अंजली घोटेकर यांनी यांनी केले.
मनपाच्या वतीने मंगळवारी आयोजित जयंती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. संत गाडगे बाबाच्या महाराजांचे प्रतिमेला पुष्पमालार्पण करुन उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी उपमहापौर अनिल फुलझेले, अतिरिक्त आयुक्त भालचंद्र बेहेरे, नोडल अधिकारी डॉ. अंजली आंबटकर, प्रभाग अधिकारी नामदेव राऊत, कवडू नेहारे, ज्योती देशमुख, अशोक डुमरे, जनसंपर्क अधिकारी युधिष्ठीर रैच, महेश शिंदे, चेतन पूलगमकर, चैतन्य चोरे आदी उपस्थित होते.
महापौर घोटेकर म्हणाल्या, संत गाडगेबाबांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला. विज्ञानाचा विचार मांडणारे संत गाडगेबाबा हे कोणत्याही शाळा, महाविद्यालयात गेले नाहीत. पण, सुशिक्षितांना लाजवणारे तत्वज्ञान त्यांनी कीर्तनातून लोकांसमोर मांडले. बाबाना गोरगरीब, दलित, भिकारी व अनाथांचे दु:ख जाणले होते. त्यांनी मानवता धर्म जागविला. गरीबांच्या सेवा करण्यातच मानवी जीवन सार्थकी लागते, हा विचार मांडला, असेही महापौर घोटेकर यांनी यावेळी सांगितले.
अनिल फुलझेले म्हणाले, खूप शिकण नसूनही बाबानी अंधश्रद्धा- अस्पृश्यता, जातीवादाविरुद्ध जनजागृती केली. जगात सर्व समान आहेत. उच्च- नीच, गरीब, श्रीमंत हा भेद पाळला नाही. एकच धर्म तो म्हणजे समता. एकच जागृत देवता ती मानवता होय. सर्वसामान्य जनतेला स्वच्छता आणि समृद्धीचा संदेश देणारे संत गाडगेबाबा यांच्या विचारातून समाजात परिवर्तन घडू शकते, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी आशिष भारती, चिन्मय देशपांडे, विकास दानव, गुरुदास नवले, विलास बेले, मनोज सोनकुसरे, धाबेकर, भूषण ठकरे, अशोक ठोंबरे, मयूर मलिक व सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Saint Gadge Baba thinks science

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.