सुरक्षा रक्षकांनी स्वत: सुदृढ असावे

By Admin | Updated: November 24, 2015 01:17 IST2015-11-24T01:17:03+5:302015-11-24T01:17:03+5:30

सुरक्षारक्षक प्रशिक्षित असणे गरजेचे आहे. सुरक्षा एजेंसींना त्यांना प्रशिक्षण देणेही बंधनकारक असते. परंतु आपल्या

Safety guards should be self-sufficient | सुरक्षा रक्षकांनी स्वत: सुदृढ असावे

सुरक्षा रक्षकांनी स्वत: सुदृढ असावे

चंद्रपूर : सुरक्षारक्षक प्रशिक्षित असणे गरजेचे आहे. सुरक्षा एजेंसींना त्यांना प्रशिक्षण देणेही बंधनकारक असते. परंतु आपल्या पाहण्यात अनेक सुरक्षा एजेंसी आहेत. जे आपल्या सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण तर दूरच परंतु त्यांचे मासिक वेतनही देत नाही. राष्ट्रवादी सेक्युरिटी फोर्स या सर्व अटी-शर्ती पूर्ण करतील, अशी आशा व्यक्त करून सुरक्षा रक्षकांनी स्वत: सुदृढ़ असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन या कार्यक्रमाचे उद्घाटक चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक संदीप दिवाण यांनी केले.
ते राष्ट्रवादी सेक्युरिटी फोर्सच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. चंद्रपूर येथील बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे भवन, जयंत टॉकीज चौक चंद्रपूर येथे राष्ट्रवादी सेक्युरिटी फोर्सचे उद्घाटन पार पडले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे वरिष्ठ नेते विनोद दत्तात्रय यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, किशोर पोतनवार, अ‍ॅड. भगवान पाटील, डी.के. आरीकर, वसंत येलचलवार, सोमेश्वर येलचलवार यांची उपस्थिती होती.
संचालन निलिमा सिंग यांनी केले तर उपस्थितांचे आभार शशिकांत मोकासे यांनी मानले. कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Safety guards should be self-sufficient