मालमत्ता करवाढीच्या विरोधात शिवसेनेचा सद्बुद्धी यज्ञ
By Admin | Updated: March 19, 2016 00:43 IST2016-03-19T00:43:09+5:302016-03-19T00:43:09+5:30
चंद्रपूर महानगरपालिकेने भरमसाठ करवाढ केली आहे. त्यातच महापौर व महानगरपालिका पदाधिकाऱ्यांचे बेजबाबदार भाष्य चंद्रपुरातील जनतेवर अन्याय करीत आहे.

मालमत्ता करवाढीच्या विरोधात शिवसेनेचा सद्बुद्धी यज्ञ
पोलीस बंदोबस्त : करवाढ पत्रकाची आहुती
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेने भरमसाठ करवाढ केली आहे. त्यातच महापौर व महानगरपालिका पदाधिकाऱ्यांचे बेजबाबदार भाष्य चंद्रपुरातील जनतेवर अन्याय करीत आहे. मालमत्ता करवाढ रद्द करण्याकरिता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल धानोरकर, सतीश भिवगडे, उपजिल्हाप्रमुख किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात महापौर तथा मनपा पदाधिकाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी यासाठी शुक्रवारी सदबुद्धी यज्ञाचे आयोजन स्थानिक गांधी चौक चंद्रपूर येथे पार पडले. यावेळी वाढीव मालमत्ता करपत्रकाची आहुती देण्यात आली.
या अभिनव आंदोलनाला युवासेना प्रमुख संदीप गिऱ्हे, शहरप्रमुख सुरेश पचारे, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख माया पटले, उपशहरप्रमुख अमोल शेंडे, विनोद गरडवा, नितीन नागरीकर, अजय कोंडलेवार, शेखर मासगोनवार, कैलाश धायगुडे, किशोर बोल्लमवार, राहुल बेले, महिला आघाडी उपशहरप्रमुख माला तुरारे, शितल बोबाटे, रजनी चिंचोळकर, विजय बच्छाव, संगीता देठे, शांता धांडे, जंगलू पाचभाई, लहू मरस्कोल्हे, कमलाकर धामनगे, मुन्ना जोगी, मनोहर जाधव, सुरेश लांजेवार, रमेश पिचदरकर, संतोष पिंपळकर, शुभम मुळे, पिंटु दुर्गे, जगदिश चौधरी, अविनाश सातपुते, अशोक उईके, रेवाराम सोनकिलहारी, मधुकर नवघरे, अंकित देशमुख, विनोद गोल्लजवार, विलास सोमलवार, प्रतीक शिवणकर, राहुल पट्टीवार, राहूल विरुटकर, सुचित पिंपळशेंडे आदींची उपस्थिती होती.
दरम्यान, सद्बुद्धी यज्ञात वाढीव करपत्रकाची आहूती देऊन निषेध करण्यात आला. मालमत्ता कर रद्द करण्यात यावे व जुण्याच करावर १० ते २० टक्के वाढ करून नागरिकांना करपत्रक देण्याची सदबुद्धी महापौर तथा मनपा आयुक्तांना यावी, करिता या अभिनव आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. (स्थानिक प्रतिनिधी)