बल्लारपुरात युवक काँग्रेसचा सद्बुद्धी यज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:20 IST2021-01-10T04:20:39+5:302021-01-10T04:20:39+5:30
बल्लारपूर : बल्लारपूर विधानसभा युवक काँग्रेसने सद्बुद्धी यज्ञ करून प्रधानमंत्री यांनी चालविलेल्या खासगीकरणाचा जोरदार विरोध केला आहे. स्थानिक बचत ...

बल्लारपुरात युवक काँग्रेसचा सद्बुद्धी यज्ञ
बल्लारपूर : बल्लारपूर विधानसभा युवक काँग्रेसने सद्बुद्धी यज्ञ करून प्रधानमंत्री यांनी चालविलेल्या खासगीकरणाचा जोरदार विरोध केला आहे.
स्थानिक बचत भवन परिसरात ७ वाजता या सद्बुद्धी यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनार्थ व जिल्हा उपाध्यक्ष करण पुगलिया यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसचे अध्यक्ष चेतन गेडाम यांच्या हातून संस्कृत श्लोकाद्वारे नरेंद्र मोदी यांना सद्बुद्धी येण्यासाठी हा आगळावेगळा उपक्रम युवक काँग्रेसने राबविला. रेल्वे, विमान, कंपनी, बीएसएनएल तोट्यात दाखवून त्यांचे खासगीकरण करण्याचा सपाटा मोदी सरकारने चालविला आहे. देशातील करोडो युवक बेरोजगारीने त्रस्त असताना देशाचा पोशिंदा शेतकरी आंदोलन करून हक्काची लढाई लढत असताना उद्योगपतींना लाभ पोहचविण्याचे काम करीत आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली. यासाठी युवक काँग्रेसने सद्बुद्धी यज्ञाचे आयोजन करण्यात आले.
हवन कार्यक्रमात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव विजय सिंग, जिल्हा प्रभारी इर्शाद शेख, जिल्हाध्यक्ष हरीश कोतावार, जिल्हा सचिव रमीज व चेतन गेडाम यांच्यासह बल्लारपूर युवक काँग्रेसचे शंकर महाकाली, गोपाळ कलवल, जुनेद सिद्दिकी शैलेश लांजेवार, सिकंदर खान, सुनील मोतीलाल, संजू सुदाला, संदीप नक्षिणे, अजहर शेख, जॉन कनकुटला, चंचल मून, समीर खान, काशी मेगनवार, श्रीकांत गुजरकर, प्रेम तारला, गोलू पवार, अविनाश पोहनकर, रूपेश रामटेके, साहिल शेख तसेच युवक काँग्रेसचे सर्व सदस्य उपस्थित होते.