ग्रामीण रस्त्यांची दुरूस्ती होणार

By Admin | Updated: April 5, 2016 03:35 IST2016-04-05T03:35:15+5:302016-04-05T03:35:15+5:30

ग्रामीण क्षेत्राच्या विकासाकरिता सातत्याने संघर्ष करून ग्रामीण क्षेत्रात रस्ते, पेयजल व अन्य सुविधा उपलब्ध करून

Rural road repair will be done | ग्रामीण रस्त्यांची दुरूस्ती होणार

ग्रामीण रस्त्यांची दुरूस्ती होणार

चंद्रपूर : ग्रामीण क्षेत्राच्या विकासाकरिता सातत्याने संघर्ष करून ग्रामीण क्षेत्रात रस्ते, पेयजल व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केला आहे. खासदार स्थानिक विकास निधी, वेकोलि सीएसआर फंड, उद्योगांद्वारा विकासाकरिता निर्गमित होणारा सीएसआर फंड खनिज विकास निधी व अन्य माध्यमातून खेड्यांचा विकास साधण्यात येणार आहे. राजुरा, भद्रावती, चंद्रपूर या तालुक्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित झालेल्या रस्त्यांच्या दुरूस्तीकरिता ७ कोटी ३ लाख रुपयांचा निधी खनिज विकास निधीच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. या कामास प्रशासकीय व वित्तीय मान्यतासुद्धा मिळाली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नातून ग्रामीण क्षेत्रातील अनेक रस्त्यांचे बांधकाम नजिकच्या कालावधीत पुर्णत्वास जाणार आहे. भद्रावती तालुक्यात खनिज विकास निधी अंतर्गत जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून १ कोटी ११ लाख रुपये खर्चाचे चंदनखेडा ते खोकरी या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण होत आहे. चरूर (घा.) ते आगरा या रस्त्याच्या मजबुती व डांबरीकरणाकरिता ५६ लाख १२ हजार, पारोधी ते चंदनखेडा रस्त्याचे नूतनीकरण व डांबरीकरणासाठी १९ लाख २९ हजार, चंदनखेडा येथील एसटी बसस्टॅन्ड ते प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे बांधकामासाठी २० लाख १७ हजार, एसटी बसस्टॅन्ड आगरा बोरगांव (धांडे) येथे रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाकरिता २३ लाख ५१ हजार रुपये मंजूर झाले आहे.
राजुरा तालुक्यात याच निधी अंतर्गत साखरी, निर्ली, धिडसी रस्त्याच्या मजबुती व डांबरीकरणाकरिता ७६ लाख ७५ हजार, पेल्लोरा ते धिडसी या रस्त्याचे मजबुती व डांबरीकरणाकरिता ६२ लाख ८२ हजार, धिडसी ते निर्ली रस्त्याकरिता ५० लाख ६३ हजार, राजुरा-माथरा-गोवरी-पवनी - कवठाळा रस्त्याकरिता ८४ लाख ५४ हजार, मार्डा-कुर्ली पोचमार्गाच्या मजबुती व डांबरीकरणाकरिता ५५ लाख १९ हजार, राजुरा-सास्ती (रामनगर), कोलगाव-कडोली-चार्ली रस्त्याकरिता ४९ लाख ३६ हजार, निर्ली-चार्ली रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरणासाठी ४९ लाख ४९ हजार तर चंद्रपूर महानगरातील रामनगर ते एमआयडीसी रस्त्याला जोडणारे महर्षी विद्यामंदिर पोचमार्गाच्या सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याच्या बांधकामाकरिता ४३ लाख ६७ हजार रुपये अशा एकुण ७ कोटी ३ लाख रुपयांचा खनिज विकास निधी मंजूर झाला आहे. ग्रामीण क्षेत्रातील रस्त्याच्या बांधकामाकरिता प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना यामुळे न्याय मिळणार आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Rural road repair will be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.