धावत्या मेटाडोरला आग

By Admin | Updated: April 27, 2017 00:43 IST2017-04-27T00:43:56+5:302017-04-27T00:43:56+5:30

नागपूरवरुन सोफासेट घेवून बल्लारपूरकडे जाणाऱ्या मेटॅडोरला अचानक आग लागली.

Running Metamorphosis Fire | धावत्या मेटाडोरला आग

धावत्या मेटाडोरला आग

वरोरा : नागपूरवरुन सोफासेट घेवून बल्लारपूरकडे जाणाऱ्या मेटॅडोरला अचानक आग लागली. या आगीत मेटॅडोर मधील सोफासेट व कॅबीन मधील रोख रक्कम जळाल्याची घटना बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास चंद्रपूर-नागपूर मार्गावरील फत्तापूर गावाजवळ घडली. यामध्ये वीस लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
एमएच २० एटी ९९२ या क्रमांकाचा मेटॉडोर नागपूर वरुन सोफासेट घेवून बल्लारपूरकडे जात होते. नागपूर-चंद्रपूर मार्गावरील फत्तापूर गावा नजीक मेटॅडोरने अचानक पेट घेतला. त्यामुळे चालकाने रस्त्याच्याकडेला वाहन उभे केले. वरोरा पोलिसांना सूचना देण्यात आली. वरोरा न.प.चे अग्निशामक दल घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले. परंतु वाहन पूर्ण जळून गेले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Running Metamorphosis Fire