विसापुरातील धावपटूंनी राज्यस्तरावर घेतली झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:37 IST2021-02-05T07:37:17+5:302021-02-05T07:37:17+5:30

निवड चाचणी विसापूरच्या राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे घेण्यात आली. निवड चाचणीचे आयोजन जिल्हा संघाचे सचिव सुरेश अडपेवार यांनी ...

The runners from Visapur took a leap at the state level | विसापुरातील धावपटूंनी राज्यस्तरावर घेतली झेप

विसापुरातील धावपटूंनी राज्यस्तरावर घेतली झेप

निवड चाचणी विसापूरच्या राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे घेण्यात आली. निवड चाचणीचे आयोजन जिल्हा संघाचे सचिव सुरेश अडपेवार यांनी केले. निवड समितीचे प्रमुख पूर्वा खेरकर, समितीचे सदस्य प्रा. संगीता बांबोळे, वर्षा कोयचाले, रोशन बुजाडे, महेश वाढई होते. १४ वर्षांखालील श्रुतिका झाडे (६०० मी.), १६ वर्षांखालील अंकिता नगराळे (८०० मी.), समृद्धी भोयर (२००० मी.), १८ वर्षांखालील करण वाढई (२०० मी.), विशाल परसुटकर (८०० मी.), प्रशांत राऊत (१५०० मी.), प्रणय आस्वले (३००० मी.), १८ वर्षांखालील ईशा कुळमेथे (१५०० मी.), २० वर्षांखालील प्रफुल ऐकरे (२०० मी.) हे विद्यार्थी लक्ष्मी मॅरेथॉन स्पोर्टिंग असोसिएशन विसापूरच्या माध्यमातून प्रशिक्षण घेत आहेत. प्रमोद पुणेकर हे प्रशिक्षक आहेत. अध्यक्ष हरी येलमुले, उपाध्यक्ष लखन झरकर, सचिव विनोद यलमुले, सहसचिव लक्ष्मी झाडे, सदस्य विठ्ठल साखरकर, सतीश रेचनकर, कल्याणी मिलमिले व वैष्णवी राऊत यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: The runners from Visapur took a leap at the state level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.