टंचाईच्या अफवेने मिठाचा भाव वधारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 05:00 AM2020-05-19T05:00:00+5:302020-05-19T05:01:21+5:30

कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. दरम्यान मीठ तुटवटा होत असल्याची अफवा छत्तीसगड राज्यातून पसरत कोठारी पर्यंत पोहचली आहे. त्यातच पुन्हा ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढल्याची घोषणा होताच नागरिकांनी मीठ खरेदीसाठी गर्दी केली आहे. त्यामुळे काही दुकानदारांनी मिठाच्या दरात वाढ केली आहे. लॉकडाऊनमुळे काम बंद झाल्याने लोकांना आर्थिक टंचाई भासत आहे.

Rumors of scarcity pushed up salt prices | टंचाईच्या अफवेने मिठाचा भाव वधारला

टंचाईच्या अफवेने मिठाचा भाव वधारला

Next
ठळक मुद्देखरेदीसाठी रांगा : अतिरिक्त दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करा

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठारी : मीठ टंचाई निर्माण झाल्याची अफवा बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथे पसरली असून नागरिक मीठ खरेदीसाठी दुकानासमोर रांगा लावत आहेत. मात्र याचाच फायदा घेत काही व्यावसायिक चढ्या दराने मिठाची विक्री करीत आहेत. अशा दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी आहे.
कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. दरम्यान मीठ तुटवटा होत असल्याची अफवा छत्तीसगड राज्यातून पसरत कोठारी पर्यंत पोहचली आहे. त्यातच पुन्हा ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढल्याची घोषणा होताच नागरिकांनी मीठ खरेदीसाठी गर्दी केली आहे. त्यामुळे काही दुकानदारांनी मिठाच्या दरात वाढ केली आहे. लॉकडाऊनमुळे काम बंद झाल्याने लोकांना आर्थिक टंचाई भासत आहे.

तेलाच्या किंमतीत वाढ
खाद्य तेलाची टंचाई जाणवत असल्याचे भासवून स्थानिक दुकानदारांनी तेलाच्या दरात वाढ केली होती. याचा आर्थिक फटका बसला. याबाबत तक्रारही करण्यात आल्या होत्या. मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यातच मीठाची टंचाईची अफवा पसरवून नागरिकांना लुटण्यात येत आहे. अशा विक्रेत्यांवर कारवाई करावी.

मीठाची कुठल्याही प्रकारची टंचाई नाही. मात्र मोठ्या व्यापाºयाकडून तुटवडा निर्माण केल्या जात आहे. टंचाई असल्याची केवळ अफवा आहे. गर्दी न करता सर्व नागरिकांना माफक दरात मीठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी साठा करण्याची गरज नाही. कृत्रीम टंचाई भासवून लूट होईल, असे काही नाही. क्षमतेपेक्षा जास्त साठा निर्माण झाल्यास मागणी कमी होण्याची शक्यता आहे.
- आशिष भटारकर,
किराणा व्यवसायिक

Web Title: Rumors of scarcity pushed up salt prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.