जिवावर उदार होऊन मृतदेह हाताळणाऱ्यांना 400 रुपये दाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 05:00 IST2021-05-23T05:00:00+5:302021-05-23T05:00:33+5:30
अपुऱ्या आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आल्याने मनपा, नगरपालिका, नगरपंचायत स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने कंत्राटी वॉर्डबाॅयची नियुक्ती करण्यात आली आहे. हे वॉर्डबाॅय आपला जीव धोक्यात घालून कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांची पॅकिंग करण्यापासून ते शिफ्टिंग करण्यापर्यंत अवघ्या ४०० रुपयांवर कोणत्याही विना तक्रारी माणुसकी डोळ्यासमोर ठेवून काम करत आहेत. जिवाची जोखीम उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमी मोबदला दिला जात आहे.

जिवावर उदार होऊन मृतदेह हाताळणाऱ्यांना 400 रुपये दाम
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दिवसभर कोरोनाबाधितांच्या सहवासात राहून काम करतानाच जिवाला असलेला धोका विसरून मृतदेह हाताळणारे कंत्राटी वॉर्डबाय यांना दिवसाला केवळ ४०० रुपये मानधन देण्यात येत आहे. त्यातही विमा कवच नाही; परंतु लॉकडाऊनमुळे कुठेच काम नसल्याने त्यांना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे.
मागील वर्षी जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अपुऱ्या आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आल्याने मनपा, नगरपालिका, नगरपंचायत स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने कंत्राटी वॉर्डबाॅयची नियुक्ती करण्यात आली आहे. हे वॉर्डबाॅय आपला जीव धोक्यात घालून कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांची पॅकिंग करण्यापासून ते शिफ्टिंग करण्यापर्यंत अवघ्या ४०० रुपयांवर कोणत्याही विना तक्रारी माणुसकी डोळ्यासमोर ठेवून काम करत आहेत. जिवाची जोखीम उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमी मोबदला दिला जात आहे. त्यामुळे त्यांचा सेवाभाव पाहून कायमस्वरूपी नोकरी सामावून घेण्याची मागणी होत आहे.
पोट भरेल एवढे पैसे द्या
बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना त्यांचे नातेवाईक हात लावत नाहीत. याप्रसंगी हा मृतदेह उचलणार कोण, हा प्रश्न पडतो. अशावेळी वॉर्डबॉय मात्र मृताचे नातवाईक बनतात. त्यामुळे त्यांना पोट भरण्याइतके तरी मानधन दिले पाहीजे. उदरनिर्वाहासाठी त्यांना मृतदेह उचलण्याबरोबर इतर कामे करावी लागत आहे. परंतु, आता कोरोनामध्ये काम करीत असल्याचे लोकांना माहिती झाल्याने इतर काम देणेही बंद झाले आहे. त्यामुळे त्यांना अडचण जात आहे.
मृतदेहांचे पॅकिंग आणि शिफ्टिंग, तरी कामाचे मोल नाही
रुग्णालयात काम करताना कामाचे तास ठरलेले नाही. वेळी अवेळी जावे लागते. रुग्णांचा जेव्हा मृत्यू होतो. तेव्हाच त्याची पॅकिग करण्यात येत असते. स्वत:ची काळजी घेत कामे करीत असतो. मात्र पाहीजे त्या प्रमाणात वेतन नाही,
- वॉर्डबॅाय
प्रशासनाला सहकार्य करण्याच्या भावनेने जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहे. परंतु, आमची कामची पाहीजे तशी दखल घेतली जात नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल एवढेही वेतन दिले जात नाही.
- वॉर्डबॉय
नातेवाइक रुग्णला हात लावत नसताना आम्ही कमी मानधन मिळत असूनही प्रामणिक कर्तव्य बजावत आहोत. आम्हाला कायमस्वरुपी कामावर घेण्यात यावे. विमा कवच देण्यात यावा.
वॉर्डबॉय
मागील वर्षभरापासून कोरोना वॉर्डात काम करीत आहे. पण मानधन खूप कमी आहे. चांगले मानधन मिळाले तर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यास मदत होईल.
-वॉर्डबॉय