लॉकडाऊन काळात दोन हजार कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 05:00 AM2020-06-02T05:00:00+5:302020-06-02T05:01:35+5:30

देशात कोरोनाचा संसर्ग होऊ लागल्याने केंद्रासह राज्य सरकार अलर्ट झाले. २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू व त्यानंतर २३ मार्चपासून देशात सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. केवळ किराना साहित्य, औषधी, दूध अशा जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातही या लॉकडाऊनची १०० टक्के अंमलबजावणी झाली. २३ मार्च ते ३ मेपर्यंत इतर सर्व दुकाने बंद होती.

Rs 2,000 crore turnover stalled during lockdown | लॉकडाऊन काळात दोन हजार कोटींची उलाढाल ठप्प

लॉकडाऊन काळात दोन हजार कोटींची उलाढाल ठप्प

Next
ठळक मुद्देव्यापाऱ्यांचे मोठे नुकसान : चंद्रपुरात एक हजार कोटींच्या उलाढालीला फटका

रवी जवळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सरकारने देशभर २३ मार्चपासून लॉकडाऊन करीत संचारबंदी लागू केली. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूवगळता इतर सर्व दुकाने, आस्थापना बंद होत्या. ३ मेपर्यंत लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली नाही. हा काळ लग्नसराईचा होता. त्यामुळे व्यापाऱ्यांना जबर फटका बसला. चंद्रपूर शहरात एक हजार कोटी व ग्रामीण भागात एक हजार कोटींची उलाढाल या काळात ठप्प झाली. परिणामी किरकोळ व्यावसायिकांसोबतच मोठ्या व्यापाºयांचेही आर्थिक समीकरण बिघडले आहे.
देशात कोरोनाचा संसर्ग होऊ लागल्याने केंद्रासह राज्य सरकार अलर्ट झाले. २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू व त्यानंतर २३ मार्चपासून देशात सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. केवळ किराना साहित्य, औषधी, दूध अशा जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातही या लॉकडाऊनची १०० टक्के अंमलबजावणी झाली. २३ मार्च ते ३ मेपर्यंत इतर सर्व दुकाने बंद होती.
चंद्रपूर शहरात कापड, रेडीमेड, होजीयरी, हार्डवेअर, जनरल, फर्नीचर, बांधकाम मटेरियल, हेअर सलून, जीम, स्टेशनरी, मोबाईल शॉपी व दुरुस्ती, प्लास्टिक यासारखी अनेक दुकाने आहेत. यात दररोज कोट्यवधींची उलाढाल होते. लॉकडाऊनच्या काळात सर्व बाजारपेठच लॉकडाऊन असल्यामुळे लग्नसराई असतानाही एक छदामही खरेदी-विक्री झाली नाही. गतवर्षीची आकडेवारी लक्षात घेतली तर तब्बल एक हजार कोटींची उलाढाल ठप्प होती.

२४० कोटींचा महसूल बुडाला
चंद्रपूर शहर व ग्रामीण भागातील व्यापारपेठा बंद असल्याने दोन्ही मिळून तब्बल दोन हजार कोटींची उलाढाल ठप्प होती. यातून सरकारलाही मिळणाºया २४० कोटींच्या महसूलावर पाणी फेरले गेले.

सराफा व्यवसायावर अवकळा
उन्हाळा म्हटला की लग्नसराईचा काळ. मात्र यंदा लॉकडाऊनमुळे लग्न व इतर कार्यक्रमावर बंदी होती. काही लग्नं उरकली. मात्र ती अत्यंत साधेपणाने. लग्नसराईत सोना-चांदी व्यवसायाची चांदी असते. मात्र यावेळी २३ मार्च ते ३ मे या कालावधीत सोना-चांदी व्यवसायातील ५० कोटींची उलाढाल ठप्प पडली.

ग्रामीण भागातही हीच स्थिती
चंद्रपूर शहरवगळता जिल्ह्यातील सर्व बाजारपेठाही लॉकडाऊन काळात बंद होत्या. कापड, रेडीमेड, होजीयरी, हार्डवेअर, जनरल, फर्नीचर, बांधकाम मटेरियल, हेअर सलून, जीम, स्टेशनरी, मोबाईल शॉपी व दुरुस्ती, प्लास्टिक व इतर दुकानातील दरवर्षीची उलाढाल बघता यंदा २३ मार्च ते ३ मे या कालावधीत एक हजार कोटींची उलाढाल होऊ शकली नाही.

उन्हाळ्याचा कालावधी लग्न व इतर कार्यक्रमांचा असतो. या काळात व्यापारपेठेत चांगली उलाढाल असते. यंदा लॉकडाऊनमुळे चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील व्यापाºयांचा विचार केला तर किमान दोन हजार कोटींची उलाढाल होऊ शकली नाही. त्याचा किरकोर व मोठ्या व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे.
- हर्षवर्धन सिंघवी,
अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स, चंद्रपूर.

Web Title: Rs 2,000 crore turnover stalled during lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.