कब्रस्तानासाठी ११ लाखांची तरतूद

By Admin | Updated: November 15, 2015 00:46 IST2015-11-15T00:46:31+5:302015-11-15T00:46:31+5:30

येथील साडे तीन एकर जागेत असलेल्या कब्रस्तानच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम तसेच एक खोली बांधकामासाठी ...

Rs 11 lakh provision for graveyard | कब्रस्तानासाठी ११ लाखांची तरतूद

कब्रस्तानासाठी ११ लाखांची तरतूद


कार्यक्रम : धानोरकरांची घोषणा
भद्रावती : येथील साडे तीन एकर जागेत असलेल्या कब्रस्तानच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम तसेच एक खोली बांधकामासाठी आमदार निधीतून ११ लाख रुपयांचा निधी देण्याचे वरोरा-भद्रावती क्षेत्राचे आमदार बाळू धानोरकर यांनी कब्रस्तान भद्रावती येथे आयोजित एका कार्यक्रमात जाहीर केले.
या कार्यक्रमाला कार्यक्रमाप्रसंगी आ. धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, नगरपालिकेचे उपाध्यक्ष प्रफुल चटकी, नगरपालिकेचे सभापती प्रमोद गेडाम, नगरसेवक विनोद वानखेडे, संदीप वडाळकर, कब्रस्तान कमिटीचे बबनसेठ जाकीर सेठ, अख्तर सेठ, जावेद सेठ, सिराज भाई, हाफीज अलीमुद्दीन कुरेशी, जफरसेठ, फईम सेठ, बशिरभाई, रमझानभाई, कासीम भाई, शहिद अली आदी उपस्थित होते.
याप्रसंगी धानोरकर पुढे म्हणाले, या बांधकामाला लवकरच सुरूवात करण्यात येईल. तसेच यापेक्षा जास्त निधी लागल्यास त्याचीसुद्धा व्यवस्था करण्यात येईल.
सदर आमदार निधी न.प. भद्रावतीकडे सोपविण्यात येणार आहे. यापेक्षा जास्त निधी बांधकामाला लागल्यास उर्वरित निधी नगर परिषद भद्रावतीतर्फे देण्यात येऊन बांधकाम पूर्ण करण्यात येईल, असे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी सांगितले. आ. धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कब्रस्तानासाठी नगर परिषद भद्रावतीतर्फे १४ लाखांची जागा खरेदी करण्यात आली होती. येथील मुस्लीम बांधवांनी कब्रस्तानच्या जागेविषयी बाळू धानोरकर यांच्याकडे मागणी केली होती.
कब्रस्तानासाठी जागा खरेदी केल्यानंतर नगर परिषद भद्रावतीतर्फे १० लाखांचे आरसीसीचे काम करण्यात आले. तसेच विधान परिषद सदस्य विनायक राऊत यांच्या निधीतून पाच लाख रुपयांचा निधी कब्रस्तान बांधकामासाठी देण्यात आला.
कब्रस्तान परिसरात आयोजित या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधव उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Rs 11 lakh provision for graveyard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.