शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

रोप वाटपात मूलचे सामाजिक वनीकरण अग्रेसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 22:37 IST

शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेच्या दृष्टीने जिल्ह्यातील काही तालुक्यात रोपांचे वाटप करण्यासाठी येथील सामाजिक वनिकरण विभागाने पुढाकार घेतलेला आहे. मागील वर्षात दिलेल्या टार्गेटपेक्षा जास्त रोपांची लागवड करून ग्रामपंचायत, वनविभाग व खाजगी वितरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे३३ कोटी वृक्षलागवडीची तयारी

भोजराज गोवर्धन ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेच्या दृष्टीने जिल्ह्यातील काही तालुक्यात रोपांचे वाटप करण्यासाठी येथील सामाजिक वनिकरण विभागाने पुढाकार घेतलेला आहे. मागील वर्षात दिलेल्या टार्गेटपेक्षा जास्त रोपांची लागवड करून ग्रामपंचायत, वनविभाग व खाजगी वितरण करण्यात आले आहे. यावषीर्ही रोप लागवड करण्यात सामाजिक वनिकरण विभाग अग्रेसर आहे. सामाजिक वनिकरण विभागामुळे वृक्षलागवडीला जिल्हयात मोठा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.प्रदूषणमुक्त जीवन जगण्यासाठी वृक्ष लागवड करणे अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीन विशेषत: वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने यावर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचा टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे. येथील सामाजिक वनिकरण विभागाच्या दोन रोपवाटीकांमधून रोप लागवड मोठया प्रमाणावर करण्यात येत आहे. सामाजिक वनिकरण विभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी वसंत कामडी यांच्या मार्गदर्शनात मूलचे क्षेत्र सहाय्यक बि. एन. नैताम व सिंगापूरचे क्षेत्र सहाय्यक एस. एन. वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने मागील वर्षी जानाळा आणि सिंगापूर येथील रोपवाटीकेत सहा लाख ७८ हजार रोपांचे वाटप करण्यात आले. शासनाने मागील वर्षी पाच लाखांचे टार्गेट मूल येथील सामाजिक वनिकरण विभागाला दिले होते, मात्र त्यापैकी अधिक रोपाचे वाटप करण्यात आले.सामाजिक वनिकरण विभागाने वनविभागाव्यतिरीक्त विविध ग्रामपंचायतींना रोपांचे वाटप केले आहे. यासोबत खासगी विक्री करण्यात आले आहे. मागील वर्षी वनविभागाला तीन लाख ६३ हजार ७५३ रोप देण्यात आले. मूल व सावली तालुक्यातील ग्राम पंचायतीला दोन लाख १८ हजार ६९३ रोपे वाटप करण्यात आले तर २७ हजार ७०९ रोपांची खासगी विक्री करण्यात आली व लावगडीसाठी ५९ हजार ६४५ रोपांचे वाटप करण्यात आले आहे.वाटप झालेली रोपेसाग ३९४५, बांबु १५४१०, सीताफळ ५८०७, आवळा १५२१२, बेहळा ५८५४, पा.सिरस ३८५४, कवठ १०९९५, पेल्टाफरस ८११९, सिसम ३१५०, निम ३५८३०, षेवगा ३२००, रेंन्ट्री ३७९५, वि. चिंच ५५०, जांभुळ ४४८२, कार्कोनिया १८५०, चिंच ४६५५, करंज २४४६७, सिसु २५९८९, खैर १२९६, अंजन २७९०, रिठा ६००, कॅषिया ५७३५, अमलतास ५५०, गुलमोहर १७५०, फणस १०७८, बोर २०९०, मोहा २६०१, पेरू १८७१, वड ५१६, पिंपळ ११८०, निंबु ११४, आंबा ३०२१, पा. सोनिया ३४३, पळस ४००० रोपांचे वाटप करण्यात आले.