जिल्हा परिषद शाळेचे छत कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:28 IST2017-07-18T00:28:06+5:302017-07-18T00:28:06+5:30
वेकोलि माजरी येथील जिल्हा परिषद हिंदी प्राथमिक शाळेचे टिनाचे छप्पर कोसळल्याची घटना रविवारी घडली.

जिल्हा परिषद शाळेचे छत कोसळले
प्रशासनाचे दुर्लक्ष : सुटी असल्याने विद्यार्थी बचावले
लोकमत न्यूज नेटवर्क
माजरी : वेकोलि माजरी येथील जिल्हा परिषद हिंदी प्राथमिक शाळेचे टिनाचे छप्पर कोसळल्याची घटना रविवारी घडली. सुट्टीचा दिवस असल्याने कोणताही विद्यार्थी शाळेत नव्हता, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
येथील जिल्हा परिषद हिंदी प्राथमिक शाळा ही ६० ते ७० वर्षे जुनी असून ही इमारत वेकोलिने बांधून दिली होती. मात्र या इमारतीची दुरूस्ती करण्यात न आल्याने इमारत व छप्पर पूर्णपणे जीर्ण झाले. त्यामुळे वारंवार तक्रार करण्यात आली.
गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने माजरी येथील शाळेतील लोखंडी छप्परच वर्गखोलीत कोसळले.
मुख्याध्यापिका मोरे यांनी वेकोलिचे महाप्रबंधक, शिक्षणाधिकारी, ग्रामपंचायत यांना पत्र पाठवून शाळा इमारतीचे छप्पर पडल्याची सूचना दिली. परंतु कोणीच या घटनेला गांभीर्याने घेतले नसल्याचे आज दिसून आले. शाळेत अतिरिक्त वर्गखोली नसल्याने मुलांना बसण्यासाठी आता अडचण निर्माण झाली आहे. तत्काळ या इमारतीची दुरुस्ती करावी किंवा इतर ठिकाणी शाळा हलवण्यात यावी, मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
याबाबत सरपंच इंदू कुमरे यांनी संवर्ग विकास अधिकारी यांना ही बाब लक्षात आणून देत इमारत दुरुस्ती करीता सांगितले आहे. लवकरच इमारतीची दुरुस्ती करण्यात येणार, असल्याचे त्यांनी म्हटले आहे.