प्रेमीयुगुलांच्या जोड्या विकृतांच्या रडारवर
By Admin | Updated: August 5, 2015 01:13 IST2015-08-05T01:13:19+5:302015-08-05T01:13:19+5:30
शाळा, महाविद्यालयाच्या नव्या सत्राला प्रारंभ झाला आहे. याच निमित्ताने प्रेमीयुगुलांना घरातूनन बाहेर पडण्याची संधी मिळत आहे.

प्रेमीयुगुलांच्या जोड्या विकृतांच्या रडारवर
सिंदेवाही : शाळा, महाविद्यालयाच्या नव्या सत्राला प्रारंभ झाला आहे. याच निमित्ताने प्रेमीयुगुलांना घरातूनन बाहेर पडण्याची संधी मिळत आहे. अनेक प्रेमीयुगूल शाळा-महाविद्यालयाला बुट्टी मारुन एकांताच्या शोधात शहराबाहेर पडू लागले आहेत. शहराबाहेरील काही ठिकाणे निर्जन असून या परिसरात रहदारी अतिशय कमी आहे. त्यामुळे एकांतसाठी प्रेमीयुगूल अशा स्थळांना पसंती देतात. परंतु याच प्रेमीयुगुलांवर काही विकृत प्रवृत्तीच्या टोळक्याची नजर असून यापासून सावध राहावे.
सिंदेवाही बसस्थानकावर दररोज प्रेमीयुगूल गप्पा मारत असताना दिसतात. प्रेमीयुगूल महाविद्यालय किंवा व्यक्तिगत कामासाठी शहरात येतात. बसस्थानकावरुन दुचाकीवर बसून तोंडाला रुमाल बांधून शहराबाहेरील निर्जनस्थळी जावून मौजमस्ती करुन बसस्थानकावर येतात. असे प्रकरण सिंदेवाही परिसरात सध्या सर्रास सुरू आहेत. त्यामुळे पोलिसांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यावर त्वरित कडक करवाई झाली नाही तर मोठे गुन्हे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाळा, महाविद्यालय, बसस्थानक, कोचिंग क्लासेस येथे मैत्री होऊन पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमसंबंधात रुपांतर वाढले आहे. (शहर प्रतिनिधी)