गुणवत्ता विकासात गटसाधन व्यक्तींची भूमिका महत्त्वाची

By Admin | Updated: May 30, 2014 23:37 IST2014-05-30T23:37:31+5:302014-05-30T23:37:31+5:30

ग्रामीण भागातील प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांंंची गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळांना वारंवार भेटी देऊन शिक्षणात झालेले बदल, नवे विचार, नवे तंत्र शिक्षकापर्यंंत पोहचविण्याकरिता गटसाधन व्यक्तींची

The role of individuals in the development of quality plays an important role | गुणवत्ता विकासात गटसाधन व्यक्तींची भूमिका महत्त्वाची

गुणवत्ता विकासात गटसाधन व्यक्तींची भूमिका महत्त्वाची

चंद्रपूर : ग्रामीण भागातील प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांंंची गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळांना वारंवार भेटी देऊन शिक्षणात झालेले बदल, नवे विचार, नवे तंत्र शिक्षकापर्यंंत पोहचविण्याकरिता गटसाधन व्यक्तींची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था चंद्रपूरचे प्राचार्य शरदचंद्र पाटील यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यातील गटसाधन व्यक्तींच्या एक दिवसीय कार्यशाळेत डायट कालेज बाबूपेठ येथे घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेला अधिव्याख्याता अपर्णा शंखदरबार, केंद्र प्रमुखांचे प्रतिनिधी रामराव हरडे, शिक्षक प्रतिनिधी विजय खनके, जे.डी. पोटे यांची उपस्थित होते. गटसाधन व्यक्तींनी शाळा भेटीमध्ये इतर अशैक्षणिक बाबीकडे लक्ष देण्यापेक्षा विद्यार्थ्यांंंच्या गुणवत्तेची चाचणी घेऊन त्याबाबत स्वयंस्पष्ट विद्यार्थीनिहाय वेिषनात्मक माहिती शिक्षकांच्या निदर्शनास आणून द्यावी व त्याबाबत वारंवार आढावा घेण्याबाबतची माहिती दिली. पुढील सत्रात इयत्ता दुसरी ते चवथीमध्ये शिकणार्‍या व अभ्यासात मागे असणार्‍या विद्यार्थ्यांंंसाठी ६0 दिवसांचा भाषा आणि गणित विषयाचा अभ्यासक्रम विकसीत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यशाळेत चर्चेनंतर गटसाधन व्यक्तींच्या सक्षमीकरणाकरिता नेतृत्व गुणांचा विकास करणे, जीवन कौशल्ये, व्यक्तीमत्त्व विकास, प्रशिक्षणाचे व्यवस्थापन, शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम आदी बाबींवर ‘प्रशिक्षण आराखडा’ तयार करण्यात आला. विशेषत: ग्रामीण भागातील  विद्यार्थ्यांंंची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
याप्रसंगी अधिव्याख्याता अपर्णा शंखदरबार, केंद्रप्रमुख रामराव हरडे यांनीही शाळा भेटीदरम्यान आलेले अनुभव कथन केले. कार्यशाळेत प्रत्येक तालुक्यातील गट साधन व्यक्ती उपस्थित होते. यशस्वीतेसाठी प्रशांत ठुबे यांनी विशेष सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: The role of individuals in the development of quality plays an important role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.