गाव विकासाच्या आराखड्यात ग्राम सभेची भूमिका महत्त्वाची

By Admin | Updated: April 25, 2016 00:51 IST2016-04-25T00:51:58+5:302016-04-25T00:51:58+5:30

पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद ग्रामीण विकासातील त्रिसुत्री आहे.

The role of the Gram Sabha in the village development plan is important | गाव विकासाच्या आराखड्यात ग्राम सभेची भूमिका महत्त्वाची

गाव विकासाच्या आराखड्यात ग्राम सभेची भूमिका महत्त्वाची

रामभाऊ टोंगे : विसापुरात ‘ग्राम उदय से भारत उदय’ कार्यक्रम
बल्लारपूर : पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद ग्रामीण विकासातील त्रिसुत्री आहे. गाव पातळीवर ग्राम विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी ग्रामसभा महत्वाची भूमिका पार पाडते. मात्र नागरिकांचा कल ग्रामसभेकडे दिसून येत नाह, अशी खंत व्यक्त करून लोकांनी ग्रामसभेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे यांनी व्यक्त केली.
बल्लारपूर पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या विसापूर ग्रामपंचायत कार्यालयात ‘ग्राम उदय से भारत उदय’ कार्यक्रमाचे औचित्य साधून रविवारी ग्रामसभा आयोजित करण्यात आली. या सभेद्वारे केंद्र व राज्य शासनाच्या लोकोपयोगी योजनांची देण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच रिता जिलटे, उपसभापती अनेकश्वर मेश्राम, उपसरंपच सुनिल रोंगे, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, सुरेखा ईटनकर, सुरेखा कोडापे, निता वनकर, प्रकाश खनके, अशोक थेरे, बुद्धीवान कांबळे, प्रमोद ठाकूर, सचिन टोंगे, ग्रामविकास अधिकारी मोरेश्वर कोमटीयांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The role of the Gram Sabha in the village development plan is important