प्रत्यक्ष वीज वापरासोबत प्रत्येकी शंभर रुपये स्थिर आकाराच्या रूपाने ग्रामीण भागासाठी बिलाचे सोडले जाते. शहरी भागासाठी हा आकार ११० ते १५० रुपये आहे. मार्च २०१७ मध्ये ५५ असलेला स्थिर आकार ऑक्टोबर २०१८ मध्ये ८०, मार्च-एप्रिल २०२१ पासून १०० रुपये ग्रामीण व शहरीसाठी ११० ते १५० रु. आकारले जात आहेत. आता त्यात वाहन आकार युनिट मागे १.१८ आहे. त्यामुळे बिलात एकूण ३५ ते ४० टक्के वाढ झाली आहे. हा आकार वाढवून महावितरण दिशाभूल करीत आहे व वीज ग्राहकांना त्याकडे मुकाटपणे पाहावे लागत आहे. ग्राहकांनी जास्त बोलल्यास वीज कापली जाते. महावितरणने ग्राहकासाठी अचानक केलेली वाढ कंबरडे मोडणारी असून, कोरोना काळात रोजगार गमावलेल्यांना परवडणारी आहे का, याचा विचार शासनाने करायला हवा. यामध्ये त्वरित सुधारणा करून वीज ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
स्थिर आकाराच्या नावाने वीज ग्राहकांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:32 IST