भद्रावती येथील स्टँम्प विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:15 IST2020-12-28T04:15:12+5:302020-12-28T04:15:12+5:30
भद्रावती : भद्रावती तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या अधिकृत स्टॅम्प पेपर्स विक्रेते हे १०० रुपये किंमतीचा स्टॅम्प पेपर्स ग्राहकांना ...

भद्रावती येथील स्टँम्प विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट
भद्रावती : भद्रावती तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या अधिकृत स्टॅम्प पेपर्स विक्रेते हे १०० रुपये किंमतीचा स्टॅम्प पेपर्स ग्राहकांना चक्क १५० रुपयांत विकत असून या प्रकारामुळे सामान्य नागरिकांची लुट होत आहे. त्यामुळे याची चौकशी करून विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भद्रावती नगर परिषदेचे सभापती विनोद वानखेडे यांनी केली आहे. यासंदर्भांत त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
गरजू लोकांना १०० रुपये किंमतीच्या स्टॅम्प पेपर्सचे विविध कार्यासाठी काम पडते. मात्र भद्रावती तहसील कार्यालयातील स्टॅम्प पेपर्स विक्रेते हे १०० रुपयांचा स्टँम्प १५० रुपयाला विकत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. एखाद्याने विचारल्यास त्याला स्टम्प पेपर मिळत नाही. त्यामुळे त्यांचे काम अडते. परिणामी त्याला नाईलाजाने १५० रुपये मोजावे लागतात. यात खेड्यापाड्यावरून येणाऱ्या ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांना आर्थिक फटका बसतो. त्यामुळे या स्टॅम्प पेपर्स विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.