रस्ते, नाल्या झाल्या उंच; पावसाचे पाणी थेट घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:18 IST2021-07-22T04:18:11+5:302021-07-22T04:18:11+5:30
मूल : शहरात अनेक दिवसांच्या दडीनंतर मंगळवारी सायंकाळी अचानक बरसलेल्या पावसाचे पाणी उंच रस्ते आणि नाल्यामुळे नागरिकांच्या घरात ...

रस्ते, नाल्या झाल्या उंच; पावसाचे पाणी थेट घरात
मूल : शहरात अनेक दिवसांच्या दडीनंतर मंगळवारी सायंकाळी अचानक बरसलेल्या पावसाचे पाणी उंच रस्ते आणि नाल्यामुळे नागरिकांच्या घरात शिरले. पाणी घरात जमा झाल्याने नागरिकांना अचानक उद्भवलेल्या समस्यांचा रात्री उशिरापर्यंत सामना करावा लागला. येथील वाॅर्ड क्रमांक ९ व १० मधील नागरिकांची चांगलीच कसरत झाली. यामुळे नगर प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त होत होता.
मूल येथे विकास कामांतर्गत वॉर्डावॉर्डात सिमेंट रस्ते आणि नाल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. हे बांधकाम करताना योग्य नियोजन करण्यात आले नाही. सिमेंट पाईपने नाल्या तयार करण्यात आल्या आहे. रस्ते व नाल्या उंच झाल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. मूलमध्ये रात्रीच्या सुमारास मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. यावेळी रस्त्यावरचे पाणी नालीमध्ये न जाता नागरिकांच्या घरात जात होते. याचा वार्ड क्र. ९ आणि १० येथील सुभाष नगरातील रहिवाशांपुढे ही नवी समस्या निर्माण झाली आहे.