रस्त्याचे रुंदीकरण, फुटपाथ तयार करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:36 IST2021-02-27T04:36:35+5:302021-02-27T04:36:35+5:30

सिंदेवाही ते रेल्वेस्थानकापर्यंत अनेक शासकीय कार्यालये, बाजार समिती, न्यायालय, मार्केट, भाजीबाजार अशी अनेक दैनंदिन कामाची प्रतिष्ठान आहेत. हाच रस्ता ...

Road widening, demand for pavement | रस्त्याचे रुंदीकरण, फुटपाथ तयार करण्याची मागणी

रस्त्याचे रुंदीकरण, फुटपाथ तयार करण्याची मागणी

सिंदेवाही ते रेल्वेस्थानकापर्यंत अनेक शासकीय कार्यालये, बाजार समिती, न्यायालय, मार्केट, भाजीबाजार अशी अनेक दैनंदिन कामाची प्रतिष्ठान आहेत. हाच रस्ता पुढे पाथरी, सावली, गडचिरोली, आरमोरी या गावांसाठी मुख्य रस्ता आहे. त्यामुळे वाहनांची वर्दळ असते. सकाळ, संध्याकाळ पायी फिरण्यासाठी याच रस्त्याचा वापर लोक करतात. त्यामुळे या रस्त्यावर फारच ताण येतो. पर्यायाने लोकांना जीव मुठीत घेऊन या रस्त्यावर चालावे लागते. म्हणून या रस्त्याच्या रुंदीकरणाची फारच गरज आहे. तसेच शिवाजी चौक ते रेल्वेस्थानकपर्यंत फुटपाथची आवश्यकता आहे. या महत्त्वपूर्ण समस्येकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी सुजाण नागरिक मंच लोनवाही-सिंदेवाहीचे हरिभाऊ पाथोडे यांनी केले आहे.

Web Title: Road widening, demand for pavement