घुग्घुस येथे रस्ता सुरक्षा अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:36 IST2021-02-05T07:36:55+5:302021-02-05T07:36:55+5:30
घुग्घुस : घुग्घुस पोलीस स्थानकाच्या वतीने प्रभारी ठाणेदार गोरक्षनाथ नागलोत यांच्या मार्गदर्शनात घुग्गुस परिसरात रस्ता सुरक्षा अभियान २०२१ ...

घुग्घुस येथे रस्ता सुरक्षा अभियान
घुग्घुस : घुग्घुस पोलीस स्थानकाच्या वतीने प्रभारी ठाणेदार गोरक्षनाथ नागलोत यांच्या मार्गदर्शनात घुग्गुस परिसरात रस्ता सुरक्षा अभियान २०२१ विविध उपक्रमाने राबविण्यात येत आहे.
रस्ता सुरक्षा अभियानचा शुभारंभ घुग्घुस बसस्थानकनजीक छत्रपती शिवाजी महाराज चौकात ऑटो, ट्रक व इतर वाहनांना रिफ्लेक्टर स्टिकर सहायक पोलीस निरीक्षक मेघा गोखरे यांच्या हस्ते लावून करण्यात आला. सदर अभियान १७ फेब्रुवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे.
‘सडक सुरक्षा जीवन रक्षा’ वाहन चालकांनी वाहन चालविताना सीट बेल्ट वापरणे, लेनची शिस्त पाळणे, वळण्यापूर्वी इशारा देणे, ओव्हरटेक उजव्या बाजूनेच करणे, वेग मर्यादा पालन करणे, मादक द्रव्य व मद्य सेवन करू नये व इतर सूचनांचे पत्रक वाहनचालकांना वाटप करण्यात आले. या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसाच्या वतीने वाहन चालकाना करण्यात आले.
यावेळी गुन्हे पथकाचे सहायक फौजदार गौरीशंकर आमटे, वाहतूक शाखेचे विनोद लोखंडे, गजानन झाडे, सुधीर मत्ते, विकास चौधरी उपस्थित होते.