शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

पोंभुर्णा एमआयडीसीचा मार्ग झाला मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2021 05:00 IST

आदिवासी तरुण, तरुणींनी उद्योजक म्हणून पुढे यावे, विशेष जागा आरक्षित करून प्राधान्य देण्याबाबतही या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. लवकरच काही प्रमुख उद्योजकांची बैठक घेऊन या एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग उभारण्याकरिता विनंती करेन, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. या बैठकीत सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना नेमक्या अडचणी काय आहेत हे जाणून घेतले, भूसंपादन आणि शेतकऱ्यांना मोबदला देण्यासंदर्भात चर्चा करताना स्थानिक शेतकऱ्यांवर आणि तरुणांवर अन्याय होऊ नये यासाठी विशेष सूचना त्यांनी दिल्या.  

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आदिवासीबहुल क्षेत्र असलेल्या पोंभुर्णा येथील बहुप्रतीक्षित एमआयडीसी प्रकल्पाला गती मिळाली असून, येत्या वर्षभरात सुमारे १५० एकर क्षेत्रात एमआयडीसी रस्ते, वीज, पाणी यांसारख्या पायाभूत सुविधा पूर्ण करणार आहे. लोकलेखा समितीचे अध्यक्ष माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानभवन येथील त्यांच्या दालनात एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि पोंभुर्णा एमआयडीसीचा मार्ग मोकळा केला. यावेळी आदिवासी तरुण, तरुणींनी उद्योजक म्हणून पुढे यावे, विशेष जागा आरक्षित करून प्राधान्य देण्याबाबतही या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. लवकरच काही प्रमुख उद्योजकांची बैठक घेऊन या एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग उभारण्याकरिता विनंती करेन, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.या बैठकीत सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना नेमक्या अडचणी काय आहेत हे जाणून घेतले, भूसंपादन आणि शेतकऱ्यांना मोबदला देण्यासंदर्भात चर्चा करताना स्थानिक शेतकऱ्यांवर आणि तरुणांवर अन्याय होऊ नये यासाठी विशेष सूचना त्यांनी दिल्या.  पोंभुर्णा एमआयडीसीकरिता मौजे कोसंबी (रीठ) येथील १०२.५० हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली असून ५.४३ हेक्टरचे क्षेत्र शासकीय अधिग्रहित आहे. यापैकी ५१ हेक्टर क्षेत्रावर औद्योगिक वसाहतीचे काम तातडीने सुरू करता येईल, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी सुधीर मुनगंटीवार यांना या बैठकीत दिली. या एमआयडीसीमुळे स्थानिक बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळेल, उद्योजकांना संधी मिळेल आणि परिसराचा आर्थिक विकास साधला जाईल, असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. या बैठकीला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अंनबालगण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजित पाटील, सहसचिव (उद्योग) संजय देगावकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे आदींची उपस्थिती होती.

 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार