१० वर्षांपासून रखडलेला रस्ता प्रशासकांमुळे पूर्णत्वाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:34 IST2021-01-08T05:34:46+5:302021-01-08T05:34:46+5:30
घुग्घुस : नेहमी वर्दळ असलेल्या रस्त्याचे रुंदीकरण, बाजूने नाली बांधकाम करण्याची मागणी दशकापासून सुरू होती. ही समस्या ग्रामपंचायत प्रशासकाने ...

१० वर्षांपासून रखडलेला रस्ता प्रशासकांमुळे पूर्णत्वाकडे
घुग्घुस : नेहमी वर्दळ असलेल्या रस्त्याचे रुंदीकरण, बाजूने नाली बांधकाम करण्याची मागणी दशकापासून सुरू होती. ही समस्या ग्रामपंचायत प्रशासकाने अवघ्या तीन महिन्यात निकाली काढली.
रस्ता बांधकाम सुरू असून काम पूर्णत्वाकडे जात आहे. तलावाकडून आठवडी बाजार, ग्रामपंचायत कार्यालयाकडे जाणाऱ्या अरुंद मार्गाचे रुंदीकरण, रस्त्याची उंची व नाली बांधकाम करण्याची मागणी समाजसेवक ईबादुल सिद्धीकी व राष्ट्रवादीचे तालुका अल्पसंख्यक सेलचे अध्यक्ष सत्यनारायण डखरे यांनी वारंवार निवेदने सादर करून सरपंचांसह संबंधित सदस्यांचे लक्ष वेधले होते, मात्र कुणीही दखल घेतली नाही. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपताच प्रशासक म्हणून शेंडे यांनी सूत्रे हाती घेतली. प्रशासक व ग्रामविकास अधिकारी यांनी समस्यांची खातरजमा करून सुमारे आठ लाख रुपये मंजूर केले. बांधकामही सुरू केले. हे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.