शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता खोदला, पाइप टाकले; मात्र पाण्याचा पत्ता नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 13:38 IST

Chandrapur : गोंडमोहाळी येथील प्रकार

विकास खोब्रागडेलोकमत न्यूज नेटवर्क पळसगाव (पिपर्डा): 'जलजीवन मिशन' अंतर्गत घराघरांत पिण्याचे पाणी पोहोचविण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. प्रत्येकाच्या घरात पिण्याचे पाणी पोहोचल्यानंतर महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा कायमचा उतरणार होता. शासनाची चांगली योजना आहे. ही योजना गोंडमोहाळी येथे राबवित आहे. त्यासाठी रस्ता खोदला, पाइपलाइनही टाकली. मात्र, तीन महिन्यांपासून पाण्याचा एक थेंबही नागरिकांना मिळाला नाही.

जलजीवन मिशन योजनेंतर्गत गावागावांत पावसाळ्यापूर्वी नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम सुरु करण्यात आले. त्यासाठी गावातील सिमेंट काँक्रीटचे मजबूत रस्ते मध्यभागातून खोदण्यात आले. मात्र, चिमूर तालुक्यातील विहीरगाव तुकूम ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या गोंडमोहाळी गावातील पाणीपुरवठा नळ योजनेसाठी खोदलेल्या खड्ड्यात तीन महिन्यांपासून पाइपलाइन टाकण्यात आली. मात्र, अजूनही नळाला पाणी नाही.

महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. गावातील पाणीपुरवठा योजनेचे काम लवकरच पूर्ण होईल म्हणून गावकरी समाधानी होते. मात्र, तीन महिन्यांनंतरही गोंडमोहळी येथील खोदलेल्या रस्त्यात पाइपलाइन टाकण्यात आली. मात्र, नळाला पाणी न आल्याने नागरिकांत नाराजी आहे. मोटार दुरुस्तीचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करून नळाला पाणी द्यावे, अशी मागणी गोंडमोहाळी येथील नागरिकांनी केली आहे.

"मोटारपंपात बिघाड आल्यामुळे दुरुस्तीकरिता दुकानात पाठविण्यात आला आहे. दुरुस्ती दूरुस झाली की लगेच आज किंवा उद्या पंप लावून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल."-प्रमानंद गुरनुले, सरपंच, विहीरगाव (तुकूम

 

टॅग्स :water transportजलवाहतूकwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातchandrapur-acचंद्रपूर