कोंढाळी मार्गावरील रस्ता खचला

By Admin | Updated: March 7, 2016 00:37 IST2016-03-07T00:37:42+5:302016-03-07T00:37:42+5:30

अचानक आलेल्या अवकाळी व वादळी पावसाचा फटका शेतकऱ्यांसोबतच रस्त्यांनाही बसत आहे. घोडपेठ-कोंढाळी मार्गावरील रस्ता खचण्यास सुरूवात झाली आहे.

Road collapsed on the Kondhali road | कोंढाळी मार्गावरील रस्ता खचला

कोंढाळी मार्गावरील रस्ता खचला

दुरुस्ती करावी : भीषण अपघाताची शक्यता
घोडपेठ : अचानक आलेल्या अवकाळी व वादळी पावसाचा फटका शेतकऱ्यांसोबतच रस्त्यांनाही बसत आहे. घोडपेठ-कोंढाळी मार्गावरील रस्ता खचण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी मोठ्या अपघाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
घोडपेठ-चंद्रपूर महामार्गावरील कर्मवीर महाविद्यालयापासून कोंढाळी गावाकडे जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. याच रस्त्यावरून गोरजा या गावातील नागरिकही ये - जा करतात. या गावांतील शेतकरी सकाळच्या वेळी दुध-दुभते व भाजीपाला भद्रावती तसेच इतर परिसरात विक्रीसाठी आणतात. याच मार्गावरून शाळेतील विद्यार्थीही प्रवास करतात. तसेच दिवसरात्र या रस्त्यावरून नागरिकांची ये-जा सुरू असते.
रस्त्याची रूंदी कमी असल्यामुळे या रस्त्यावरून एकेरी वाहतूकच करावी लागते. या परिसरातील शेतकरी त्यांच्या शेतीत उत्पादित झालेला माल मोठ्या वाहनांनी इतरत्र विक्रीसाठी नेतात. त्यामुळे नागरिकांना व शेतकऱ्यांना या रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वाहन काठावर जाऊन भिषण अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने त्वरित रस्ता दुरूस्त करावा, अशी मागणी गोरजा व कोंढाळी येथील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Road collapsed on the Kondhali road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.