दिवाळीसाठी पत्कराताहेत जोखीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 05:00 AM2019-10-29T05:00:00+5:302019-10-29T05:01:33+5:30

रेल्वे प्रवासातही हाच प्रकार दिसून येत आहे. दिवाळी सणानिमित्त चंद्रपूर जिल्हास्थळापासून सर्व तालुक्यांच्या मार्गावर काळ्या-पिवळ्या ट्रॅक्ससह कमांडर, ऑटोरिक्षा धावत आहे वाहनचालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून भरत असल्यामुळे वाहनचालकाला बसण्याइतपत जागासुद्धा नसते. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.

Risk of falling for Diwali | दिवाळीसाठी पत्कराताहेत जोखीम

दिवाळीसाठी पत्कराताहेत जोखीम

Next
ठळक मुद्देघरी जाण्यासाठी धडपड : रेल्वेगाड्याही फुल्लं

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: दिवाळी सणामुळे प्रवाशी जोखीम पत्करून प्रवास करीत आहेत. जिल्हा व तालुकास्थळी अवैध वाहतुकीला उधान आले. मात्र पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. रेल्वे प्रवासातही हाच प्रकार दिसून येत आहे.
दिवाळी सणानिमित्त चंद्रपूर जिल्हास्थळापासून सर्व तालुक्यांच्या मार्गावर काळ्या-पिवळ्या ट्रॅक्ससह कमांडर, ऑटोरिक्षा धावत आहे वाहनचालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून भरत असल्यामुळे वाहनचालकाला बसण्याइतपत जागासुद्धा नसते. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. वाहनचालक बसस्थानकासमोरच वाहने उभी करीत असतात आणि बस सुटण्याच्या वेळा चालकांना माहिती असल्याने बसच्या पाच मिनिटांपूर्वी वाहने काढतात. त्यामुळे अनेक प्रवासी बसची प्रतीक्षा न करता या वाहनाने प्रवास करतात. वाहतूक पोलिसांनाही हा प्रकार माहिती आहे.
मात्र, कारवाई करीत नसल्याने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांशी साटेलोटे असल्याची बाब स्पष्ट दिसत आहे. ही प्रवासी वाहतूक सुरू असतानाच काही दारु तस्करसुद्धा अशा वाहनांचा आडोसा घेऊन दारू तस्करी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिवाळीचा हंगाम लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाकडून अशा वाहनांची झडती घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, अनेक बेरोजगार युवकांनी व्यवसायासाठी कर्जावर वाहने घेतली.

Web Title: Risk of falling for Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.