वीजखांबामुळे अपघाताचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:26 IST2021-03-24T04:26:33+5:302021-03-24T04:26:33+5:30
तलावांच्या सर्वेक्षणाची मागणी ब्रह्मपुरी : जिल्ह्यातील सिंचनाचे प्रमाण अतिशय अल्प आहे. अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावांची दुरुस्ती केली जात नाही. ...

वीजखांबामुळे अपघाताचा धोका
तलावांच्या सर्वेक्षणाची मागणी
ब्रह्मपुरी : जिल्ह्यातील सिंचनाचे प्रमाण अतिशय अल्प आहे. अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावांची दुरुस्ती केली जात नाही. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरवशावर शेती करावी लागत आहे. कृषी सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेला मामा तलाव नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तलावांचे सर्वेक्षण करून दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.
रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी
कोरपना : तालुक्यातील अनेक गावांची व गावाला जोडणाऱ्या रस्त्यांची कित्येक वर्षे लोटूनही अवस्था ‘जैसे थे’ आहे. या रस्त्याचे भाग्य उजळणार कधी, असा प्रश्न ग्रामस्थांकडून केला जात आहे.
रेडियम पट्ट्या लावाव्यात
राजुरा : आदिलाबाद मार्गावर अंतर फलक व झाडावर रेडियम पट्ट्या लावण्यात याव्या, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. राज्य सीमेवरील राज्य सीमा फलक सुस्थितीत करून सीमेचे सौंदर्यीकरण करणे आवश्यक आहे.
तंटामुक्त समित्यांना आर्थिक बळ द्यावे
नागभीड : महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या माध्यमातून गावातील वातावरण विकासाभिमुख होऊ शकते. मात्र, या समित्यांमध्ये राजकारण शिरायला नको. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गावातील तंटामुक्त गाव समित्यांनी चांगले कार्य केले. गृह विभागाने समित्यांना आर्थिक बळ द्यावे.
नागभीड मार्गावर नियमांचे उल्लंघन
ब्रह्मपुरी : नागभीड ते वडसा मार्गावर दररोज शेकडो ऑटो चालतात. नियमांचे उल्लंघन करून प्रवाशांना कोेंबून नेण्याच्या घटना सतत वाढत आहेत. मात्र, पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने ऑटोचालकांची मनमानी वाढली. ब्रह्मपुरी येथून विविध कामांसाठी वडसा येथे जाणाऱ्या नागरिकांची, शालेय विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.