स्वातंत्र्यलढ्याचा उदय गोंडवाना विचारक्रांतीतून

By Admin | Updated: March 21, 2016 00:43 IST2016-03-21T00:43:54+5:302016-03-21T00:43:54+5:30

भारतात इंग्रजांनी आपले साम्राज्य वाढविण्यास प्रारंभ केल्यानंतर त्याला प्रथम विरोध कोणी केला असेल ...

The rise of independence from Gondwana thought revolution | स्वातंत्र्यलढ्याचा उदय गोंडवाना विचारक्रांतीतून

स्वातंत्र्यलढ्याचा उदय गोंडवाना विचारक्रांतीतून

दिलीप सोळंके: चंद्रपूर येथे व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा
चंद्रपूर: भारतात इंग्रजांनी आपले साम्राज्य वाढविण्यास प्रारंभ केल्यानंतर त्याला प्रथम विरोध कोणी केला असेल तर तो या देशातील मूळ निवासी असलेल्या गोंडीयन समाजाने, समाजातील विचारवंत क्रांतिकारकांनी. मात्र प्रस्थापित जातीय व्यवस्थेने बरबटलेल्या लोकांनी त्यांचे क्रांती विचार लेखन स्वरूपात जगासमोर मांडले नाही. मूळ निवासी असलेल्या आदिवासी जमातीमधील विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक हा कमी असल्याचे प्रतिबिंबित करुन त्यांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र तो समाज ज्या परिसरात वास्तव्य करतो, तो ज्या नैसर्गिक वातावरणाशी जुळलेला आहे त्यांच्याशी समरस होणारी शिक्षणप्रणाली विकसित केली जात नाही, असे विचार प्रसिद्ध विचारवंत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक दिलीप सोळंके यांनी व्यक्त केले.
चंद्रपूर येथील वक्तृत्व कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्था चंद्रपूर या संस्थेने चंद्रपूर येथे एक दिवसीय वक्तृत्व कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष लोकेश मडावी होते. प्रमुख पाहुणे म्हणून विचारवंत दिलीप सोळंके, सामाजिक कार्यकर्ते बापूराव मडावी, डॉ. सुजाता ताराम, प्राचार्य डॉ. विजय खंडाते, एसबीआय बल्लारपूरचे उपव्यवस्थापक अनंता टेकाम होते. ही कार्यशाळा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना व सामाजिक कार्यकर्त्यांना ऊर्जा निर्माण करुन देणारी असून समाजास दिशादर्शक ठरणारी आहे. जास्तीत जास्त जणांना याचा लाभ मिळावा, यासाठी अशा कार्यशाळेचे आयोजन करण्याचा मानस उपस्थित पाहुण्यांनी व्यक्त केला. कार्यशाळेचा व संस्थेचा उद्देश प्रास्ताविकेमधून रमेश कुंभरे यांनी मांडला. संचालन ज्योतीराम गावंडे तर आभार सुधाकर कन्नाके व विजय तोसाडे यांनी मानले. कार्यक्रमाला नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The rise of independence from Gondwana thought revolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.