शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

झेडपी शाळेतील रजिस्टरमध्ये जातीच्या रकान्यात खोडतोड; मुख्याध्यापकावर होणार निलंबनाची कारवाई

By साईनाथ कुचनकार | Updated: May 6, 2024 19:27 IST

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने प्रकरण आणले उघडकीस; मुख्याध्यापकावर होणार निलंबनाची कारवाई

चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील मांगलगाव जिल्हा परिषद शाळेत एका प्रकरणामध्ये खारिज रजिस्टरमध्ये जातीच्या रकान्यात खोडतोड असल्याचे प्रकरण जात पडताळणी समितीने उजेडात आणले आहे. माना ही जात खोडून महार करण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून संबंधितांवर काय कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. हे प्रकरण उजेडात येताच जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तत्काळ पत्र काढून कोणत्याही मुख्याध्यापकांनी खारिज रजिस्टरमधील मूळ नोंदीमध्ये खोडतोड करू, नये अन्यथा निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ज्यावेळी मुलाला शाळेत दाखल केले जाते. 

त्यावेळी शाळांमध्ये असलेल्या दाखल खारिज रजिस्टरमध्ये त्याची सर्व माहिती नोंदविली जाते. यामध्ये जातीच्या रकान्यात त्याची जी जात असेल तीसुद्धा नोंदविली जाते. भविष्यात जेव्हा केव्हा जात प्रमाणपत्र काढायचे असते. तेव्हा शाळेतील याच रजिस्टरवरील माहितीच्या आधारे पुरावा मानला जातो. मात्र मांगलगाव जिल्हा परिषद शाळेतील दाखल रजिस्टरमध्ये एका प्रकरणात खोडतोड करण्यात आली. चक्क माना जातीची महार करण्यात आले आहे. या प्रकरणी जात पडताळणी समितीला संशय आल्याने त्यांनी मूळ रजिस्टर घेऊन मुख्याध्यापकांना कार्यालयात बोलावले. तेव्हा हा सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला आहे. त्यानंतर जात पडताळणी समितीने जिल्हा परिषद प्रशासनाला यासंदर्भात कळविले असून संबंधित मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई होणे गरजेचे असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

मूळ अभिलेखाचे काळजीपूर्वक करावे जतनया घटनेनंतर जिल्हा परिषद प्राथमिक विभागाने तत्काळ पत्र काढून शाळा प्रशासनाने मूळ अभिलेखामधील कोणत्याही प्रकारची खाडाखोड किंवा हेतुपुरस्पर नव्याने जातीचा समावेश करू नये. अभिलेखाचे काळजीपूर्वक जतन करावे. अशा सूचना दिल्या आहेत.

जिल्हा परिषदेने काढले पत्रजात पडताळणी समितीने दाखल रजिस्टरमध्ये खोडतोड केल्याचे प्रकरण उघडकीस आणून दिल्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांना एक पत्र पाठविले आहे. यामध्ये कोणत्याही मुख्याध्यापकांनी अशी खोडतोड करू नये, अशी खोडतोड केल्यास संबंधित मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे पत्र काढले आहे.

टॅग्स :chandrapur-pcचंद्रपूरzp schoolजिल्हा परिषद शाळा