शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

धनदांडग्यानी फिरविली करमणूक कराकडे पाठ

By admin | Updated: March 6, 2015 01:11 IST

मनोरंजनाचे प्रभावी साधन म्हणून दूरचित्रवाहिन्यांना महत्व आहे. करमणूकीच्या माध्यमातून शासनाला लाखो रुपयांचा महसूल मिळत असते.

चंद्रपूर : मनोरंजनाचे प्रभावी साधन म्हणून दूरचित्रवाहिन्यांना महत्व आहे. करमणूकीच्या माध्यमातून शासनाला लाखो रुपयांचा महसूल मिळत असते. मात्र, केबल आॅपरेटच्या करबुडीत धोरणामुळे शासनाला लाखो रुपयांचा फटका बसत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ४३२ केबल आॅपरेटरकडे तब्बल सव्वा कोटी रुपयांचा कर थकीत आहेत. यात चंद्रपूर शहरातील ६० पेक्षा जास्त धनदांडग्या आॅपरेटरचा समावेश आहे. कर भरण्यासाठी केबल आॅपरेटरना जिल्हा करमणूक विभागाने नोटीस बजावले आहेत. मात्र, या नोटीसांना न जुमानता कर भरण्यास दिरंगाई केली जात आहे. राज्य शासनाकडून चालू वर्षात चंद्रपूर जिल्ह्याला ५ कोटी रुपयांचे करमणूक कर वसूल करण्याचे उद्दीष्ट दिले. यापैकी ३ कोटी ९६ लाख ९१ हजार रुपये वसूल करण्यात आले आहे.चंद्रपूर जिल्ह्यात १५ तालुक्यात ४३२ केबल आॅपरेटर आहेत. या केबल आॅपरेटरकडे ९९ हजार १९४ ग्राहक आहेत. तर ३३ हजार ८१३ हे डीटीएच जोडणीचे ग्राहक आहेत. ग्राहकांकडून नियमीत शुल्क घेऊनही केबल आॅपरेटर मात्र करमणूक विभागाकडे कर भरण्यास दुर्लक्ष करीत आहेत. करमणूक विभागाचे अधिकारीही अनेकदा नोटीस बजावले आहे. मात्र, कर भरण्यास दुर्लक्ष होत असल्याने ३१ मार्चपूर्वी कर वसूल करण्याचे प्रयत्न करमणूक विभागाकडून सुरू आहे. (स्थानिक प्रतिनिधी)