शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांना डावलून धनदांडग्यांना घरकूल !

By admin | Updated: March 6, 2015 01:17 IST

अन्न, वस्त्र, निवारा या माणसांच्या मुलभूत गरजा असून देशातील गरीब जनतेला निवाऱ्याच्या सोयीसाठी घरकूल योजनेची निर्मिती करण्यात आली.

चंद्रपूर : अन्न, वस्त्र, निवारा या माणसांच्या मुलभूत गरजा असून देशातील गरीब जनतेला निवाऱ्याच्या सोयीसाठी घरकूल योजनेची निर्मिती करण्यात आली. घरकूल मिळण्यासाठी दारिद्रयरेषेखाली असणे अनिवार्य असताना दारिद्रयरेषेखालील जनगणना करताना गरिबांना डावलून धनदांडग्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे गरीब जनतेला वगळून लखपतींना घरकूल योजनेचा लाभ मिळत असल्याचा आरोप सावली तालुक्यातील उसेगाव येथील महिलांनी केला आहे.दारिद्रयरेषेखालील नागरिकांची करण्यात आलेले जनगणना रद्द करून पुन्हा जनगणना करण्यात यावी, जेणेकरुन या योजनेत गरिबांना समाविष्ट होता येईल. ही बाब अनेकदा लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु गरिबांचा वाली कोण? हे अजूनही कोड्यात आहे. गरीब जनतेची ही गंभीर समस्या सोडविण्यासाठी कोणताही अधिकारी पुढाकार घेताना दिसत नाही. त्यामुळे गरीब जनतेला घरकूल योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.सन २००२ मध्ये दारिद्रयरेषेखालील जनतेची जनगणना करण्यात आली. ज्या कर्मचाऱ्यांना जनगणना करण्याचे काम देण्यात आले. त्यांनी गावातील घरी बसून वस्तुस्थिती न पाहता नियम, निकष बाजूला सारुन संपूर्ण गावाची जनगणना केली. त्यामुळे गरीब जनतेला वगळून धनदांंडग्या लोकांची नावे दारिद्रयरेषेखाली समाविष्ट करण्यात आले. सद्यास्थितीत तालुक्यातील उसेगाव येथे ६२ घरकूल मंजूर असून यात गर्भश्रीमंत लोकांचा समावेश आहे, असा आरोप उसेगाव येथील शोभा बारसागडे, मंगला पडगिलवार, अनुसया मेश्राम, छाया बोरकुटे, कविता चिंचोलकर, डोनुजी उरकुडे, अंजना मेश्राम, यशवदा भोयर, अंजना ठाकूर, धुरपता मेश्राम, निर्मला मेश्राम, कासुबाई मेश्राम, रुख्माबाई मेश्राम, नागेश्वर पेंदोरकर, उद्धव भोयर आदी महिला व पुरुषांनी केला आहे. गर्भश्रीमंताना मिळालेली घरकूले रद्द करावी, अशी मागणी त्यांंनी केलीे आहे. या महिलांनी गावातील ग्रामपंचायत येथे जाऊन दारिद्रयरेषेखालील घरकूल यादी मागितली असता त्यांना नकार देऊन तुम्ही पंचायत समितीमध्ये चौकशी करा, असा सल्ला ग्रामपंचायत प्रशासनाने दिला. एकंदरीत २००२ च्या जनगणनेनुसार गरीब जनतेला डावलण्याचा मोठा प्रयत्न केला गेल्याने शासनाच्या घरकूल योजनेपासून मुकण्याची पाळी गरीब जनतेवर आली आहे. प्रशासनाने यात लक्ष घालून गरीब जनतेला वस्तुस्थिती पाहून घरकूल योनजेचा लाभ द्यावा, अशी मागणी उसेगाव येथील घरकूल योजनेपासून वंचित जनतेनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)