हातसळीद्वारे सुरू केला तांदळाचा व्यवसाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 00:27 IST2018-02-02T00:26:51+5:302018-02-02T00:27:13+5:30
नांदेड येथील आम्रपाली बचत गटाच्या महिलांनी हातसळीद्वारे दर्जेदार तांदूळाचा व्यवसाय सुरु केला असून नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

हातसळीद्वारे सुरू केला तांदळाचा व्यवसाय
संजय अगडे।
ऑनलाईन लोकमत
तळोधी (बा.) : नांदेड येथील आम्रपाली बचत गटाच्या महिलांनी हातसळीद्वारे दर्जेदार तांदूळाचा व्यवसाय सुरु केला असून नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
ग्रामीण व शहरी भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या. शिवाय, मार्गदर्शन शिबिरातून योजनांचे महत्त्व समजावून सांगितले जात आहे. मात्र ग्रामीण भागातील महिला स्वयंरोजगारासाठी पुढे येत नाही. दरम्यान, शासनाकडून बचतगटाची माहिती मिळाल्याने नांदेड येथे काही दिवसांपूर्वी आम्रपाली बचतगटाची स्थापना करण्यात आली. स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांना उत्तम प्रकारचा मार्गदर्शन व्हावा याकरिता दिशा लोकसंचालीत केंद्राने या बचतटाला मार्गदर्शन केले. एचएमटी धानाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांच्या गावातील आम्रपाली महिला बचत गटाच्या माध्यमातून हातसळीद्वारे उत्तम तांदूळ विक्री व्यवसाय महिलांनी सुरू केला. हातसळीद्वारे धानाला उखळात घेवून मुसळाने हातसळीचा तांदूळ तयार केला जातो. या तांदळापासून उत्तम प्रकारचे जीवनसत्व मिळते. हे तांदूळ मानवी जीवनाला अतिशय लाभदायक असल्यामुळे सातत्याने मागणी वाढत आहे. आम्रपाली महिला बचतगटात अध्यक्ष सिंधू लक्ष्मण रामटेके, कुंदाबाई किशोर शेंडे, शेंडे, राजश्री हेमलता रामटेके, मंगला, जिजा खोब्रागडे, संगीता शेंडे, यशोधरा वासनिक, ललीता खेमचंद गेडाम, जिजा वासनिक, उषा माणिक रामटेके, भागरथा रामटेके, निर्मला शामकुळे, संध्या आदेश भोयर, अर्पिता हिरालाल रामटेके, कौशल्या खोब्रागडे, सुमन खोब्रागडे आदींचा समावेश आहे.