उपशास्त्रीय संगीताने रसिक मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 21:19 IST2019-02-06T21:19:10+5:302019-02-06T21:19:36+5:30

पुणे येथील वाद्यवृंद स्वरस्वप्नची शास्त्रीय व सिनेसंगीताची मेजवानी, प्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांनी सादर केलेल्या गीत रामायणच्या माध्यमातून श्रीरामाच्या पावन स्मृतींना दिलेला उजाळा व तरूण गायक प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन अशी सप्तसुरांची उधळण हिराई संगीत महोत्सवात यंदा लक्षणीय ठरली.

Rhapsody mesmerized by subtotal music | उपशास्त्रीय संगीताने रसिक मंत्रमुग्ध

उपशास्त्रीय संगीताने रसिक मंत्रमुग्ध

ठळक मुद्देहिराई संगीत महोत्सव : महाराष्ट्रातील नामवंत कलावंतांचे सादरीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पुणे येथील वाद्यवृंद स्वरस्वप्नची शास्त्रीय व सिनेसंगीताची मेजवानी, प्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांनी सादर केलेल्या गीत रामायणच्या माध्यमातून श्रीरामाच्या पावन स्मृतींना दिलेला उजाळा व तरूण गायक प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन अशी सप्तसुरांची उधळण हिराई संगीत महोत्सवात यंदा लक्षणीय ठरली.
राणी हिराईच्या स्मृती जागवणाऱ्या स्रेहांकितचा दोन दिवसीय हिराई संगीत महोत्सव शनिवारी येथील प्रियदर्शिनी सभागृहात पार पडला. पुणे येथील प्रसिद्ध वाद्यवृंद स्वरस्वप्न या शास्त्रीय व सिनेसंगीताच्या कार्यक्रमाने महोत्सवाला सुरूवात झाली. २१ तरूण कलावंतांचा सहभाग असलेल्या या वाद्यवृंदाने स्वप्ना दातार यांच्या समर्पक निवेदनात व्हॉयोलिन व तबल्यावर संगीताचे स्वर छेडत रसिकांना मंत्रमुग्ध केले.
दुसरे सत्र राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात ३ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता रवींद्र साठे यांनी ‘गीत रामायण’च्या माध्यमातून गुंफले. वयोवृद्धांपासून तर तरूणांपर्यंत सर्व वयोगटांतील श्रोत्यांनी आनंद घेतला. प्रियदर्शिनी सभागृहात गायक प्रथमेश लघाटे व गायिका मुग्धा वैशंपायन यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाने गुंफले. मुग्धाने पूर्वी रागातील बंदिश सादर केली. सुमधूर गाण्यांमुळे रसिकांनी आनंद घेतला.
माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री तथा सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्राचे आधारवड शांताराम पोटदुखे यांच्या स्मृतीला हे महोत्सव समर्पित करण्यात आला होता. गजानन वडगावकर यांचा गायक रवींद्र साठे व आयएमएचा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल स्रेहांकितचे अध्यक्ष डॉ. राजीव देवईकर यांचाही सत्कार झाला.

Web Title: Rhapsody mesmerized by subtotal music

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.