रेती प्रकरणात आरएफओ व वनपालाची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:12 IST2021-01-13T05:12:35+5:302021-01-13T05:12:35+5:30

चंद्रपूर : रेती भरलेले ट्रॅक्टर पकडल्यानंतर एका राजकीय व्यक्तीचे नाव घेऊन बदनामी केल्याच्या आरोपाखाली वरोराचे वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड ...

RFO and forester will be questioned in the sand case | रेती प्रकरणात आरएफओ व वनपालाची होणार चौकशी

रेती प्रकरणात आरएफओ व वनपालाची होणार चौकशी

चंद्रपूर : रेती भरलेले ट्रॅक्टर पकडल्यानंतर एका राजकीय व्यक्तीचे नाव घेऊन बदनामी केल्याच्या आरोपाखाली वरोराचे वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड व वनपाल विजय रामटेके यांच्याविरोधात वरोरा ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, राजकीय व्यक्तीने विभागीय वनाधिकाऱ्यांकडेही निवेदन देऊन चौकशीची मागणी केली. निवेदनाची दखल घेऊन विभागीय वनाधिकारी जगताप यांनी आरएफओ राठोड व वनपाल रामटेके यांच्या चौकशीचे आदेश दिले. सहायक वनसंरक्षक (तेंदू) एस. एल. लखमावाड हे पाच दिवसांत अहवाल सादर करणार आहेत.

वरोरा वनपरिक्षेत्राची जबाबदारी वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड यांच्याकडे येण्यापूर्वी सावली व बफर झोन क्षेत्रातील कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी वरोरा तालुक्यातील शेगाव ते दादापूर मार्गावर रेती भरलेले ट्रॅक्टर पेट्रोलिंगदरम्यान पकडले. त्यावेळी एका राजकीय व्यक्तीचे नाव घेऊन ते म्हणत असतील तर ट्रॅक्टर सोडतो, अशी अट घातली. यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर त्या राजकीय व्यक्तीने वरोरा ठाण्यात आरएफओ राठोड व वनपाल रामटेकेविरुद्ध तक्रार केली. याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. दरम्यान, विभागीय वनाधिकारी एस. व्ही. जगताप यांंनीही वनपरिक्षेत्रातील अनागोंदी कारभाराचे निवेदन देण्यात आले. त्यामुळे जगताप यांनी आरएफओ राठोड व रामटेके यांच्या चौकशीचे आदेश सहायक वनसंरक्षक लखमावाड यांना दिले.

Web Title: RFO and forester will be questioned in the sand case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.