चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटीतर्फे क्रांती दिवस
By Admin | Updated: August 10, 2016 00:32 IST2016-08-10T00:32:18+5:302016-08-10T00:32:18+5:30
९ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता हुतात्मा स्मारक येथे चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटीच्यावतीने क्रांती दिवस कार्यक्रम घेण्यात आला.

चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटीतर्फे क्रांती दिवस
चंद्रपूर : ९ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता हुतात्मा स्मारक येथे चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटीच्यावतीने क्रांती दिवस कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी हुतात्मा स्मारकासमोर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, प्रदेश सचिव आसावरी देवतळे, माजी प्रदेश सचिव सुनीला लोढिया, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, असंघटित कामगार विभाग जिल्हाध्यक्ष विनोद संकत, संजय रत्नपारखी, केशव रामटेके, सुलेमान अली, वंदना भागवत, बंडोपंत तातावार, दीपक काटकोजवार, सुभाष दोनाडे, शाकीर मलक, हरिदास लांडे, देविदास गुरनुले, देवराव घाटे, वैशाली गेडाम, राजा काझी, सागर वानखेडे, पंकज टापरे, राजू सारीडेक, संदीप सिडाम, राजू दास, निखिल धनवलकर, सागर खोब्रागडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)