पकडीगुडमचे कालवे पुनर्जीवित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:27 IST2021-05-24T04:27:10+5:302021-05-24T04:27:10+5:30
कोरपना : तालुक्यातील पकडीगुड्डम सिंचन प्रकल्पाचे कालवे तुटले व बुजले असल्याने, शेकडो हेक्टरवरील शेती सिंचनापासून वंचित आहे. त्यामुळे या ...

पकडीगुडमचे कालवे पुनर्जीवित करा
कोरपना : तालुक्यातील पकडीगुड्डम सिंचन प्रकल्पाचे कालवे तुटले व बुजले असल्याने, शेकडो हेक्टरवरील शेती सिंचनापासून वंचित आहे. त्यामुळे या कालव्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
पकडीगुड्डम हा मध्यम सिंचन प्रकल्प आहे. या प्रकल्पातून ३० वर्षांपूर्वी परिसरातील शेती सिंचनासाठी कालवे तयार करण्यात आले. मात्र, सदर कालव्यांचे काम पूर्णपणे योग्यरीत्या न झाल्याने आजही येथील शेती सिंचनापासून वंचित आहे. त्यामुळे धरण उशाला अन् कोरड घशाला अशी स्थिती येथील झाली आहे. प्रकल्पातून एका खासगी सिमेंट उद्योगाला नियमित मुबलक पाणीपुरवठा होत आहे. मात्र, शेतीला एक थेंबही पाणी मिळत नाही. त्यामुळे प्रमुख उद्देश दूर सारला गेला आहे. या ठिकाणचे कालवे सुस्थितीत असते, तर शेतकऱ्यांना बारमाही पिके घेता आली असती. त्यामुळे शेती उत्पादनातही वाढ झाली असती. यावर आता तरी सिंचन विभागाने लक्ष देऊन कालव्याचे पुनर्जीवन करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.