गडचांदूर येथे विविध शासकीय विभागाची आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:28 IST2021-03-05T04:28:40+5:302021-03-05T04:28:40+5:30

कोरपना : गडचांदूर येथील नगर परिषदेच्या सभागृहात खासदार बाळू धानोरकर यांनी गुरुवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत कोरपना तालुक्यातील ...

Review meeting of various government departments at Gadchandur | गडचांदूर येथे विविध शासकीय विभागाची आढावा बैठक

गडचांदूर येथे विविध शासकीय विभागाची आढावा बैठक

कोरपना : गडचांदूर येथील नगर परिषदेच्या सभागृहात खासदार बाळू धानोरकर यांनी गुरुवारी आढावा बैठक घेतली.

या बैठकीत कोरपना तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

आरोग्य विभाग, विद्युत विभाग, महसूल विभाग व पोलीस प्रशासनाचे अधिकारी सदर बैठकीला उपस्थित होते. एक-एक करून सर्व अधिकाऱ्यांकडून त्यांच्या विभागांचा आढावा घेण्यात आला. उपस्थित नागरिकांनासुद्धा समस्या मांडण्याची संधी देण्यात आली. त्यानुसार नागरिकांच्या ज्या-ज्या समस्या आहे, त्या त्वरित सोडून अहवाल सादर करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच जिल्हास्तरावर वेगवेगळ्या विभागाला ज्या प्रशासकीय अडचणी आहे, त्यासुद्धा नोंदविण्यात आल्या. कोरोनाचे लसीकरण तत्काळ सुरू करण्याच्या सूचनासुद्धा यावेळी आरोग्य विभागाला देण्यात आल्या. शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी देण्यात येणाऱ्या सुविधा व सवलती गावागावांत जाऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना विद्युत विभागाला देण्यात आल्या. यावेळी राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे, गडचांदूरच्या नगराध्यक्ष सविता टेकाम, तहसीलदार महेंद्र वाकलेकर, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, संवर्ग विकास अधिकारी बबनराव पाचपाटील, ठाणेदार गोपाल भारती नगर परिषदेचे उपाध्यक्ष शरद जोगी, मुख्याधिकारी विशाखा शेळकी, अरुण निमजे, विजय बावणे, सुरेश मालेकर, श्याम रणदिवे, पापय्या पोन्नमवार, विक्रम येरणे, आशिष देरकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष उमेश राजूरकर उपस्थित होते.

Web Title: Review meeting of various government departments at Gadchandur