महसूल अधिकारी सुस्त : रेती तस्करीला ऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:14 IST2021-01-13T05:14:23+5:302021-01-13T05:14:23+5:30
घुग्घुस : वर्धा नदी हल्ल्याघाटावरून दिवसभर रेती खनन होत आहे. रात्रीला या रेतीची हायवा ट्रल्व ट्र्रॅक्टरद्वारे बिनदिक्कतपणे तस्करी सुरू ...

महसूल अधिकारी सुस्त : रेती तस्करीला ऊत
घुग्घुस : वर्धा नदी हल्ल्याघाटावरून दिवसभर रेती खनन होत आहे. रात्रीला या रेतीची हायवा ट्रल्व ट्र्रॅक्टरद्वारे बिनदिक्कतपणे तस्करी सुरू आहे. पोलीस ठाण्याच्या समोरून जाणाऱ्या रेती ट्रॅक्टरचे चालक सीसीटीव्ही कॅमेऱ्याला वाकुल्या दाखवत रेतीची तस्करी करीत आहे. यावरून पाणी कुठे मुरत आहे, हे लक्षात येते.
वर्धा नदीच्या हल्ल्याघाटावरून रेती वाहतुकीसाठी व नदीकडे जाणारे रस्ते महसूल विभागाने जेसीबीने खोदून बंद केले होते. रेती तस्करांनी ते खड्डे बुजवून पुन्हा रेती तस्करी सुरू केली आहे. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच उपविभागीय अधिकारी यांनी घुग्घुस मंडळ आधिकाऱ्याच्या कक्षेतील चार तलाठ्यांच्या बदल्या केल्या. त्यात पटवारी दिलीप पिलाई यांची नागाळा, नागाळाचे तलाठी घुग्घुस, पांढरकवड्याचे तलाठी यांना संजय निराधारमध्ये तर शेणगावचे तलाठी अजयपूर असे बदलीचे आदेश होते. मात्र या आदेशाची अंमलबजावणी तहसीलदारांकडून झाली नसल्याने रेती तस्करांना अधिक बळ मिळाले आहे.
तलाठी कार्यालयात रेती तस्करांच्या बैठका
अवैधरीत्या रेती खनन जोरात सूुरू असून नदीकाठावर मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा केलेला आहे. ही बाब अधिकाऱ्यांना दिसू नये, याबाबत नागरिकात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रेती तस्करांच्या बैठका होत असून घुग्घुस तलाठी कार्यालय याचे केंद्रस्थान बनले आहे. रेती तस्करी थांबविण्याकरिता येथील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची तात्काळ उचलबांगडी करण्याची गरज सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत.