शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
2
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
3
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
4
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
5
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
6
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
7
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
8
केजरीवाल जेलमधूनच बघणार लोकसभा निकाल, अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाकडून ५ जूनपर्यंत राखून
9
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
10
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
11
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
12
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
13
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
14
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
15
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
16
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
17
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
18
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
19
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
20
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!

परतीच्या पावसाने हिरावला दिवाळीचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 5:00 AM

पंधरा दिवसादरम्यान कमी कालावधीत पिकणारे धान व सोयाबीन मळणी करून बहुतेक शेतकरी विक्रीकरिता बाजारात नेतात होता. पण, यंदा पावसामुळे शेकडो शेतकऱ्यांन खरीपातील शेतमाल विकताच आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाल्याने दिवाळी सणावर निराशेचे सावट होते.

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये निराशा : शेतमाल विक्री न झाल्याने आर्थिक कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील शहरी भागामध्ये दिवाळी उत्साहात साजरी होत असताना ग्रामीण भागात मात्र परतीच्या पावसाने हा आनंद हिरावला आहे. दिवाळीपूर्वी दहा ते पंधरा दिवसादरम्यान कमी कालावधीत पिकणारे धान व सोयाबीन मळणी करून बहुतेक शेतकरी विक्रीकरिता बाजारात नेतात होता. पण, यंदा पावसामुळे शेकडो शेतकऱ्यांन खरीपातील शेतमाल विकताच आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाल्याने दिवाळी सणावर निराशेचे सावट होते.जिल्ह्यात मूल, सावली, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड तालुक्यात दरवर्षी भात शेतीची लागवड वाढतच आहे. या पिकासाठी पोषक हवामान असल्याचे पाहून काही शेतकऱ्यांनी वावराच्या बांध्या तयार केल्या. मात्र, यंदा सततच्या पावसामुळे नाल्याकाठ्यावरील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले. परिपक्व झालेल्या भात शेतीची सतत पडणाºया कापसामुळे कापणी करता आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हंगामाचे नियोजन बिघडले. पावसामुळे कापणी व मळणी न करणाºया शेतकºयांची संख्या जिल्ह्यात हजारोंच्या घरात आहेत.ब्रह्मपुरी, नागभीड तालुक्यात भाताचे दाणे जमिनीवर पडून कोंब आले. भाताच्या वैरणीची गुणवत्ताही खराब झाली. अति पावसामुळे भात खाचरातील बांधाचे नुकसान होऊन माती व वाळू साचली. वाळू साचून खाचराची गुणवत्ता कमी झाली. मागील गतवर्षीप्रमाणे दिवाळी जवळ येत आल्याचे पाहून शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून विविध कार्यकारी संस्था अथवा व्यापाऱ्यांकडे शेतमाल विकण्याच्या तयारीत होते. परंतु मागील चार दिवसांपासून जिल्ह्याच्या पंधराही तालुक्यांमध्ये परतीचा पाऊस पडला. त्यामुळे परिपक्व झालेल्या सुमारे चार ते साडेचार हजार हेक्टर भात शेती नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.खरेदी केंद्रांबाबत अद्याप अनिश्चितताजिल्ह्यात परतीचा पाऊस पडत असल्याने विविध पिकांचे नुकसान होत आहे. तर दुसरीकडे खरीप हंगामातील वर्गीकृत पिकांचा हमीभाव शासनाने जाहीर केला. या मूग, सोयाबीनचा समावेश आहे. शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडे जाण्याची वेळ येणार नाही, यासाठी पणन विभागाच्या नियंत्रणात हमीभावानुसार शेतमाल खरेदी केंद्र सुरू करण्याचे जाहीर झाले होते. राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाही अनेक जिल्ह्यांमध्ये खरेदी केंद्रांची कार्यवाही पूर्ण झाली. परंतु, जिल्ह्यात अद्याप अनिश्चितता आहे. पावसामुळे यंदा शेतमाल विकण्यास उशीर झाला. संबंधित विभागाने यासंदर्भात तातडीने कार्यवाही करून खरेदी केंद्र निश्चित करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.वीज कोसळून १२ बकऱ्या ठारगडचांदूर : परतीच्या मुसळधार पावसासह वीज कोसळल्याने १२ बकऱ्या ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी ठीक २ वाजताच्या सुमारास नारंडा येथील शिवारात घडली. बकऱ्यांचा कळप घेऊन गुराखी एका एक झाडाच्या आडोशला बसले होते. दरम्यान, अचानक वीज कोसळली. या घटनेची माहिती जिल्हा परिषद सदस्य वीणाताई मालेकर, सुरेश मालेकर यांना मिळताच त्यांनी तहसील व तलाठ्यांना कळविले. नारंडा येथील पोलीस पाटील नरेश परसुटकर, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष दीपक मोहूरले, मिलिंद ताकसांडे, अरूण सोंपीत्तरे आदींच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. शेळीच्या मालकांची नावे कळू शकली नाही.हळद पिकावरपानगळचा प्रादुर्भावपारंपरिक पीक टाळून यंदा शेकडो शेतकऱ्यांनी हळदीची लागवड केली. परंतु सतत पडत असलेल्या पावसाचा फटका हळदी पिकाला बसला आहे. हळदीवर तांबेरा रोगाचा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पानगळ होत आहे. परिणामी, हळदीच्या उत्पादनात या वर्षी ३० टक्के उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सुमारे ६०० हेक्टरवर हळदीची लागवड झाली. पण, शेतातील पाण्याचा निचरा न झाल्याने हळद पीक वाया जाऊ शकते.तातडीने पंचनामे करावे- सुभाष धोटेराजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यातील धान, सोयाबीन व कापूस उत्पादक तालुक्यातील शेतीचे २६ व २७ ऑक्टोबर रोजी आलेल्या परतीच्या पावसाने सर्वाधिक नुकसान झाले. हातचे पीक गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे तयार करून नुकसान भरपाईचा अहवाल राज्य शासनाकडे तातडीने पाठविण्याची मागणी आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Rainपाऊस