शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

सेवानिवृत्त शिक्षकाने स्वीकारले १७ मुलांचे पालकत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 5:00 AM

पूनमचंद मोतीलाल चव्हाण असे या कनवाळू बापाचे नाव आहे. महावीर हिंदी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, मास्तरी येथून सन २००८ मध्ये ते शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त झाले. पत्नी मरण पावली तर मोठा मुलगा अपघातात ठार झाला. दु:खाचा डोंगर कोसळल्यानंतर त्यांची बायपास सर्जरी झाली. लकव्याचे दुखणेही मागे लागले. परंतु त्यांनी याही पश्चात हार मानली नाही. रुग्णवाहिका घेवून रुग्णांना मोफत सेवा देऊ लागले.

प्रवीण खिरटकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : सेवानिवृत्त झाल्यानंतर रुग्णवाहिकेत नि:शुल्क सेवा रुग्णांना देणे सुरू केले. त्यानंतर ग्रामीण भागात मोफत औषधी वाटप केल्या. परंतु शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर अंगातील शिक्षक गेला नाही. त्यामुळे ११ वर्षांपासून गरीब मुलांना सोबत घेवून त्यांचे पालकत्त्व स्वीकारीत पेंशनमधून त्या मुलांचे शिक्षण, भोजन व राहण्याची व्यवस्था करीत तो १७ मुलांचा बाप झाला आहे.पूनमचंद मोतीलाल चव्हाण असे या कनवाळू बापाचे नाव आहे. महावीर हिंदी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, मास्तरी येथून सन २००८ मध्ये ते शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त झाले. पत्नी मरण पावली तर मोठा मुलगा अपघातात ठार झाला. दु:खाचा डोंगर कोसळल्यानंतर त्यांची बायपास सर्जरी झाली. लकव्याचे दुखणेही मागे लागले. परंतु त्यांनी याही पश्चात हार मानली नाही. रुग्णवाहिका घेवून रुग्णांना मोफत सेवा देऊ लागले. प्रत्येक महिन्याच्या १६ तारखेला यवतमाळ जिल्ह्यातील भांडेकडा येथे स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांना सोबत घेवून मोफत औषधीचे वाटप करू लागले. ग्रामीण भागात फिरत असताना गरीबी व पालकांच्या व्यवसनाधिनतेमुळे मुले शिक्षण घेवू शकत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुरुवातीला पूनमचंद हे तीन मुलींना घेवून आले. यात दोन मुली एचआयव्ही बाधित होत्या. त्यांच्यावर स्वत: चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार करून घेतल्यानंतर त्या आजारातून मुक्त झाल्या. घरी पत्नी नाही. मुली मोठ्या होत आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या पालकांकडे सुपूर्द केले. सन २००९ पासून वरोरा शहरातील बावणे लेआऊटमधील स्वत:च्या घरात बाल संस्कार केंद्र सुरू केले. इयत्ता ४ ते १२ वीपर्यंतचे १७ मुले शिक्षण घेत आहे. एक मुलगा आयटीआय करीत आहे. एकाने आयटीआय केल्यानंतर त्याला राजुरा येथे इलेक्ट्रीक दुकान टाकण्याकरिता पूनमचंद चव्हाण यांनी मदत केली. शुल्क, भोजन व निवासाची व्यवस्था ते करीत आहे.मी व सर्व मुले पहाटे ४ वाजता उठतात. योगासने, धावणे, व्यायाम झाल्यानंतर मुले शाळेत जातात. मुलांची शिकवणी, त्यांच्यासोबत राहाणे व भोजन करणे हा नित्यक्रम बनला आहे. मुलांच्या प्रकृतीची काळजी वरोरा शहरातील डॉ. विवेक तेला, डॉ. पाटील, डॉ. डोंगरे घेत असून मुलांची तपासणी व औषधी ते मोफत देतात.-पूनमचंद चव्हाण.आईच्या मृत्युनंतर त्यांना एकटे वाटत होते. निवृत्तीनंतर घरात राहून बाजारात जाणे आणि नातवे सांभाळण्यापेक्षा ते गरीब मुलांवर संस्कार करीत असून त्यांना शिक्षण देत आहेत. ते आपल्या पेंशनमधून गरीब मुलांवर खर्च करीत असल्याने त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. ते एक चांगले काम करीत आहे. याचा मला गर्व आहे.- मनोज चव्हाणरक्ताचे नाते असलेल्या मुलांचा सांभाळ प्रत्येक जण आपापल्या परीने करीत असतो; पण ज्यांना रक्ताच्या नात्यातील कोणीच नाही वा नात्यातील कोणी सांभाळ करीत नाही, अशा मुलांचे काय? या मुलांना आपले समजून अख्खे जीवन त्यांच्याचसाठी घालविणारा ‘बाप माणूस’देखील आपल्यांमध्येच असतो. अशा बाप माणसाला ‘फादर्स डे’निमित्त ‘लोकमत’चा सलाम ! 

टॅग्स :Father's Dayजागतिक पितृदिन