सेवानिवृत्त सभासद तथा गुणवंत्त विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:29 IST2021-03-23T04:29:58+5:302021-03-23T04:29:58+5:30
भद्रावती : जि.प. प्राथमिक शिक्षक पतसंस्था भद्रावतीतर्फे नुकताच सेवानिवृत्त सभासद शिक्षकांचा सपत्नीक सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. त्यानिमित्त एकूण ...

सेवानिवृत्त सभासद तथा गुणवंत्त विद्यार्थ्यांचा सत्कार
भद्रावती : जि.प. प्राथमिक शिक्षक पतसंस्था भद्रावतीतर्फे नुकताच सेवानिवृत्त सभासद शिक्षकांचा सपत्नीक सत्कार कार्यक्रम घेण्यात आला.
त्यानिमित्त एकूण २३ सेवानिवृत्त शिक्षक सभासदांना शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक मदन मत्ते व प्रेमिला डाहूले यांचासुद्धा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जादा गुंतवणूक करणारे शिक्षक सभासद यांनासुद्धा सन्मानित करण्यात आले. पतसंस्थेतील सभासदांचे पाचवी व आठवी शिष्यवृत्तीधारक, दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेले गुणवत्ताधारक पाल्य यांचासुद्धा प्रमाणपत्र, शिल्ड तथा रोख पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून पंचायत समिती भद्रावतीचे सभापती प्रवीण ठेंगणे, अध्यक्षस्थानी वंदना मार्कंडवार, प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष श्रावण टोंगे, मानद सचिव प्रशांत तुराणकर, उज्ज्वला बांदूरकर उपस्थित होते.