अतिरिक्त शिक्षक समायोजनाबद्दल शिक्षक संघाचे धरणे
By Admin | Updated: August 30, 2016 00:35 IST2016-08-30T00:35:11+5:302016-08-30T00:35:11+5:30
सन २०१५-१६ च्या संचनिर्धारणानुसार संपूर्ण जिल्ह्यात अनेक शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत.

अतिरिक्त शिक्षक समायोजनाबद्दल शिक्षक संघाचे धरणे
प्रक्रिया पारदर्शी करावी : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची मागणी
चंद्रपूर : सन २०१५-१६ च्या संचनिर्धारणानुसार संपूर्ण जिल्ह्यात अनेक शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत. मात्र अतिरिक्त शिक्षक हे सेवाजेष्ठता यादी, जात प्रवर्ग, बिंदू, नामावली, जात वैधता या बाबींचा विचार करुन ठरविण्यात यावे, तसेच ही प्रकीया पारदर्शी करण्यात यावी. यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने सोमवारी दुपारी ३ ते ६ वाजताच्या दरम्यान शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
ंपुणे शिक्षण आयुक्तांच्या आदेशानुसार खाजगी अनुदानीत शाळामधील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनांची प्रकीया सुरु झाली आहे. त्यानुसार संस्था स्तरावरुन प्राप्त अतिरिक्त शिक्षकांची १६ आॅगस्टला शिक्षणाधिकारी (माध्य) यांच्याकडून यादी प्रसीद्ध करण्यात आली. त्यासाठी अतिरिक्त शिक्षकांकडून हरकती मागविण्यात आल्या. २२ आॅगस्टला शिक्षणाधिकारी यांची सुनावणी होऊन सायंकाळी ५ वाजेपर्यंत यादी प्रकाशीत होणे अपेक्षीत होते. परंतू ही प्रकीया २२ व २३ तारखेला रात्री उशिरा पर्यंत चालविली. त्यामुळे ही यादी वेळेवर प्रकाशीत होऊ शकली नाही. ही प्रकीया पूर्ण करताना ती पारदर्शक होणे गरजेचे आहे. त्यामुळे ही यादी प्रकाशीत करताना सर्व निकषाचे पालन करावे, तसेच सेवाजेष्ठता यादी, जात, प्रवर्ग, बिंदू, नामावली, जात वैधता या बाबींचा विचार करुन शिक्षक अतिरिक्त ठरविण्यात यावे. यासाठी संघटनेचे कार्यवाह सुधाकर अडबले यांच्या नेतृत्वा धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, कार्यवाह श्रीहरी शेंडे, कार्याध्यक्ष लक्ष्मण धोबे, महामंडळ सदस्य जगदीश जुनगरी, उपाध्यक्ष दिगंबर कुरकर, सुनिल शेरकी, वसुधा रायपूरे, सहकार्यवाह अनिल कंठीवार, शालिक ढोरे, नितीन जिवतोडे, अनिता अमृतकर, कोषाध्यक्ष नाभिलास भगत, संघटक दीपक धोपटे, देवराव निब्रड, धनंजय राऊत, रामदास आलेवार, प्रा. ज्ञानेश्वर सोनकुसरे, सल्लागार श्रीराम भोयर, गजानन नागापूर आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)