वाहतुकीवर आळा घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:17 IST2021-02-19T04:17:24+5:302021-02-19T04:17:24+5:30
व्यावसायिकांवर कारवाई करावी चंद्रपूर : शहरात दिवसेंदिवस प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढत आहे. लाॅकडाऊनपूर्वी काही प्रमाणात प्लास्टिक पिशव्या बाजारातून हद्दपार ...

वाहतुकीवर आळा घाला
व्यावसायिकांवर कारवाई करावी
चंद्रपूर : शहरात दिवसेंदिवस प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढत आहे. लाॅकडाऊनपूर्वी काही प्रमाणात प्लास्टिक पिशव्या बाजारातून हद्दपार झाल्या होत्या. मात्र आता पुन्हा बहुतांश व्यावसायिकांकडे प्लास्टिक पिशव्या दिसत असून, ते खुलेआम ग्राहकांना देत आहे. त्यामुळे संबंधित पथकांनी कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
--
अन्नपदार्थांची उघड्यावर विक्री, आरोग्य धोक्यात
घुग्घुस : शहरात अस्वच्छतेच्या वातावरणात अन्नपदार्थाची विक्री केली जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जिल्ह्यात अन्न निरीक्षकांच्या अनेक जागा रिक्त असताना याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अपुऱ्या अधिकाऱ्यांमुळे खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानांची तपासणी करताना तारांबळ उडत असते. याकडे लक्ष द्यावे
शासकीय निवासस्थाने झाली दुर्लक्षित
चंद्रपूर : शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून शासनाने निवासस्थाने बांधून दिलेली आहेत. मात्र याचा उपयोग अपवादानेच केला जात आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी निवासस्थाने दुर्लक्षित आहेत. प्रामुख्याने आरोग्य सेवेंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी ही सोय करून दिली आहे. त्याचा मात्र वापरच केला जात नाही. ही निवासस्थाने ओस पडलेली आहेत.
बसमध्ये प्रथमोपचार साहित्य उलपब्ध करा
चंद्रपूर : प्रत्येक बसमध्ये प्रथमोपचार पेटी असावी, असे परिवहन विभागाचे सर्व आगारांना निर्देश आहे. मात्र ग्रामीण भागात धावणाऱ्या बसमध्ये प्रथमोपचार पेटीच दिसून येत नाही. त्यामुळे वरिष्ठांच्या निर्देशाची बस आगारांकडून अवहेलना होत आहे. एखाद्या वेळी अपघात घडल्यास जखमीवर उपचार करण्यास अडचण येऊ शकते. याकडे आगार प्रशासनाने लक्ष देऊन आपात्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी उपाययोजनांची मागणी आहे.
जिवती तालुक्यातील समस्या सोडवा
जिवती : जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यात अनेक समस्या आजही सुटल्या नाहीत. वीज, रस्ते, पाणी अशा मूलभूत सुविधादेखील येथे पुरेशा प्रमाणात पोहोचल्या नाहीत. सुविधांअभावी येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिवती तालुक्याची स्थापना होऊन आता अनेक वर्षे झाली. मात्र पाहिजे त्याप्रमाणात या तालुक्याचा विकास झाला नाही.
नोकरभरती नसल्याने बेरोजगारीचा प्रश्न
गोंडपिपरी : कोरोना संकटामुळे अजूनही नोकरभरती पाहिजे तशी होत नसल्यामुळे बेरोजगारांमध्ये नैराश्य निर्माण होत आहे. अनेकांनी पैसे खर्च करुन स्पर्धा परीक्षेचे वर्ग सुरू केले. मात्र शासनाकडून नोकरभरतीबाबत जागा निघणे बंद झाले आहे. परिणामी दिवसेंदिवस बेरोजगारीच्या संख्येत वाढ होत आहे.
पुरस्कारप्राप्त गावातच स्वच्छतेचे तीनतेरा
सिंदेवाही : ग्रामीण भागातील उघड्यावरील हागणदारी बंद व्हावी, यासाठी शासनाने प्रोत्साहनपर अनुदान योजना सुरू केली. गावात शौचालयाची संख्या वाढली. परंतु, या शौचालयाचा वापर नगण्य आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष द्यावे.